सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाचे तालुकास्तरीय विविध स्पर्धेत यश

सांगोला (कटुसत्य वृत्त):- सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते विकासरत्न माजी आमदार स्वर्गीय भाई डॉ. गणपतराव देशमुख यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त आयोजित तालुकास्तरीय विविध स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. सदर स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल सांगोला येथे संपन्न झाल्या. सालाबाद प्रमाणे आयोजित केलेल्या या स्पर्धेत विद्यालयाने यशस्वीतेचा झेंडा कायम ठेवला.
दरवर्षीप्रमाणे श्रमिक दिनाचे औचित्य साधून इयत्ता पहिली ते चौथी गटासाठी आयोजित केलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अंबादास नागानंद मेटकरी या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला, तर निबंध स्पर्धेत गौरी नागेश लवटे या विद्यार्थिनीने दुसरा क्रमांक मिळवला. तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धेमध्ये इयत्ता चौथी मधील कैवल्य सुधीर गायकवाड याने प्रथम क्रमांक, अक्षरा अजित नवले हिने द्वितीय क्रमांक, गौरी नागेश लवटे हिने तृतीय क्रमांक तर उत्तेजनार्थ क्रमाक रिदा मुबीन काझी हिने पटकावून यशाची परंपरा कायम ठेवली.
वक्तृत्व स्पर्धेसाठी जगन्नाथ साठे , शुभांगी पवार, निबंध स्पर्धेसाठी नानासाहेब घाडगे तर रंगभरण स्पर्धेसाठी मेहराज मण्यार, समाधान शिंदे यांचे या यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष पी.सी. झपके, संस्था सचिव म. शं. घोंगडे, संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक उदय बोत्रे, विद्यामंदिर परिवारातील सर्व प्रशासकीय स्टाफ, सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment