स्वातंत्र्यानंतर देश बलशाली करण्यात सैनिकांचे योगदान महत्वपूर्ण - चेतनसिंह केदार सावंत

सांगोल्यात भाजपच्या वतीने स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, वीर माता-पित्यांचा सन्मान
सांगोला (कटुसत्य वृत्त): स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांचा त्याग अमुल्य आहे. याची माहिती नव्या पिढीला होणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. तसेच स्वातंत्र्यानंतर देश बलशाली करण्यात सैनिकांचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे गौरवोद्गार भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केले. सांगोल्यात भाजपच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, शहीद झालेल्या जवानांच्या वीर माता-पित्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा होत असून हा दिवस भारतीयांना अनुभवता यावा याकरिता अनेकांनी प्राणाची आहुती दिली. त्यांच्या बलिदानातून स्वातंत्र्यांची पहाट आपल्या नशिबी आली. या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्यांमध्ये सांगोला तालुक्यातील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचा मोलाचा वाटा राहिला आहे. देशाला इंग्रजांच्या तावडीतून सोडविण्यासाठी काहींनी तुरुंगवास भोगला, तर काहींना प्राणाची आहुती द्यावी लागली. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यात स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान आहे. त्याप्रमाणे स्वातंत्र्यानंतर गेल्या ७५ वर्षात देश बलशाली करण्याचे श्रेय सैनिकांचे आहे, असे गौरवोद्गार भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केले. यावेळी भाजपच्या वतीने स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, वीर माता-पित्यांचा पुष्पगुच्छ देवून त्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, कॅप्टन रावसाहेब साळुंखे, गजानन भाकरे, डॉ. ग. भि. मिसाळ, शिवाजीराव गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार- सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शिवाजीराव गायकवाड, डॉ.गणपत मिसाळ, गजानन भाकरे, मेजर रावसाहेब साळुंखे, मेजर नरेश साळुंखे,कप्तान दत्तात्रय केदार, सुभेदार पंडित साळुंखे, वारंट ऑफिसर उत्तम चौगुले, बाळाप्पा येलपले, विलास व्हनमाने, दुर्योधन हिप्परकर, लक्ष्मण येलपले, विजय ननवरे, वसंत सुपेकर, मानस कामलापूरकर, तानाजी कांबळे, अजित तवटे, राहुल व्हनमाने, रमेश विटेकर, विकास वलेकर, प्रवीण जानकर, सुरेश बुरांडे, बाळासाहेब सावंत, राजू शिंदे, दीपक केदार, भाऊ पाटील, नदकुमार रायचुरे, अजित केदार, श्रीनिवास क्षीरसागर, रोहित सावंत, अनिकेत शिंदे, बाळासो चव्हाण, विनोद उबाळे, भारत धनवडे आदी भाजपा कार्यकर्ते व स्वातंत्र्य सैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment