पौष्टिक अन्नघटक व औषधी गुणधर्म आसलेल्या रानभाज्यांचा आहारातील वापर वाढवावा - आमदार शहाजीबापू पाटिल


सांगोला (कटुसत्य वृत्त):- दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी कृषि विभागाच्या आत्मा आंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव , क्रांती दिन व जागतीक आदिवासी दिनानिमीत्त नविन भाजी मंडई , सांगोला येथे रानभाची महोत्सव आयोजित करण्यात आला. महोत्सवाचे उद्घाटन आमदार शहाजीबापू पाटील, विधानसभा सदस्य सांगोला यांचे हस्ते करण्यात आले. महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या तसेच विविध प्रकारचे सेंद्रिय उत्पादने, बियाणे प्रदर्शनासाठी व विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. विविध रानभाज्यांचे ओळख, पौष्टिक अन्नघटक, औषधी गुणधर्म , रानभाज्यांची पाककृती याविषयी माहिती महोत्सवामध्ये देण्यात आली. पोषणयुक्त सुरक्षित अन्न योजनेअंतर्ग महिला लाभार्थींना परसबागेमध्ये लागवड करण्यसाठी भाजीपाला बियाणे किटचे वाटप आमदार महोदयांचे हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर शेतीमध्ये व अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये चांगले काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार शहाजीबापू पाटिल यांनी आपल्या भागामध्ये येणाऱ्या रानभाज्या ओळखुन, त्याचे आहारातील व आरोग्यविषयक महत्व याबाबत गावोगावी मोठ्याप्रमाणावर जनजागृती करावी. आहारामध्ये रानभाज्यांचा वापर वाढवावा. रानभाज्याविक्रीची व्यवस्था निर्माण करावे असे आवाहन केले. प्रास्तविकामध्ये तालुका कृषि अधिकारी शावाजी शिंदे यांनी रानभाज्यांचे ओळख, महत्व , सेंद्रिय शेती , पोषणयुक्त सुरक्षित अन्न योजना ,प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेबाबत माहिती दिली. कार्यक्रमास तहसिलदार अभिजीत पाटील, पोलिस निरिक्षक अनंत कुलकर्णी , मुख्याधिकारी कैलास केंद्रे , वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे , कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी , शेतकरी , महिला बचत गटाचे सदस्य , शेतकरी मित्र, शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री उत्कर्ष चंदनशिवे यांनी तर आभार मंडळ कृषि अधिकारी श्री रमेश भंडारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषि विभागाचे आधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment