कुर्डुवाडीसह परिसरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 3, 2022

कुर्डुवाडीसह परिसरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

कुर्डुवाडीसह परिसरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

मोफत दिनदर्शिका,शालेय साहित्य,गणवेश,खाऊ वाटप

                    कुर्डुवाडी(कटूसत्य वृत्त):- शहरासह विस्तारीत भागात लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.प्रथम कॉम्रेड आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी जयंतीचे औचित्य साधून आंतरभारती हायस्कूल, आण्णाभाऊ साठे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहीत्य,गणवेश,खाऊ तसेच दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी माढा वेलफेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष धनराज शिंदे,शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डीकोळे,माजी नगराध्यक्ष समीर मुलाणी,माजी उपनगराध्यक्ष हरिभाऊ बागल,माजी नगरसेवक आयुब मुलाणी,अरविंद पवार,संजय टोनपे,टायगर ग्रुपचे अध्यक्ष रवी आठवले,पिनू शेंडे,श्रीकांत बागल,प्रशांत घुगे, विजय साळुंखे, विशाल कापरे, राहुल आवारे,केशव कांबळे, मनसे शहराध्यक्ष सागर बंदपट्टे,संदीप अवताडे यांच्या उपस्थितीत टेंभुर्णी रोड मार्केट यार्ड शेजारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages