साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 3, 2022

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

                    लऊळ(कटुसत्य वृत्त): येथील ग्रामपंचायत कार्यालयात लोकशाहीर साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना  अभिवादन करण्यात आले.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या लेखणीच्या माध्यमातून चळवळीत काम करीत असलेल्या  मराठी माणसाला नवचेतना दिली.कामगारांना एकत्रित करत त्यांचे प्रबोधन करण्यासाठी देखील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा शाहिरी डफ कडाडला होता.अण्णाभाऊंच्या 101 व्या जयंतीनिमित्त उपस्थितांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

                    याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दिनेश कांबळे, महेश बागल, खंडू भोंग,बाळू गायकवाड, ग्रामपंचायत कर्मचारी बंडू चांदणे, अक्षय लोकरे, संपत काटकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages