आर. पी. आय. (आठवले) पक्षाची पंढरपूर तालुका व शहर कार्यकारणी जाहीर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 3, 2022

आर. पी. आय. (आठवले) पक्षाची पंढरपूर तालुका व शहर कार्यकारणी जाहीर

आर. पी. आय. (आठवले) पक्षाची पंढरपूर तालुका व शहर कार्यकारणी जाहीर

                  पंढरपूर (कटुसत्य वृत्त):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची बैठक पंढरपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे पार पडली.

                  यावेळी आरपीआयचे प्रदेश संघटक सचिव दीपक चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर विभागाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली.

                  यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक सरवदे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश कांबळे, सरचिटणीस सुरज बनसोडे, संजय सावंत, मोहन ढवळे, युवक जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे, भारत शिंदे, रवी बनसोडे, राहुल मोरे, एडवोकेट महेश कसबे, एडवोकेट काकासाहेब केंगार, दत्ता वाघमारे, कैलास कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.

                  यानंतर शहरातून नूतन पदाधिकाऱ्यांच्या वतीने राष्ट्रपुरुषांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी अभिवादन रॅली काढण्यात आले. याप्रसंगी मोठ्या संख्येने संख्येने आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

                  यामध्ये जिल्हा कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष सर्वगोड, तालुका संपर्कप्रमुख भिमशाहीर देविदास बंगाळे, पंढरपूर तालुका अध्यक्षपदी लक्ष्मण कांबळे, कार्याध्यक्षपदी प्रकाश सोनवणे, सरचिटणीस कल्याण बंगाळे, उपाध्यक्ष सुभाष वाघमारे, बाळासाहेब रणपिसे, संघटन सचिव श्रीनाथ बाबर तसेच पंढरपूर विभाग तालुका युवक अध्यक्षपदी दत्ता वाघमारे, अण्णासाहेब कांबळे, युवक आघाडी सरचिटणीस अमर फडतरे, कार्याध्यक्ष अमोल गायकवाड, संघटन सचिव नितीन बंगाळे, शहराध्यक्ष समाधान लोखंडे, कार्याध्यक्ष उमेश वाघमारे, उपाध्यक्ष अनिल माने, शहर युवक अध्यक्ष प्रदीप रणदिवे तसेच महिला आघाडी तालुका अध्यक्षपदी अविंदा गायकवाड, करकंब शहर प्रमुख विजयकुमार शिंदे आदिंना निवडीचे पत्र प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले.

                  बैठकीसाठी राजकुमार भोपळे, एकनाथ वाघमारे, अरविंद नवघरे, नितीन ननवरे, संदीप कसबे, भास्कर चंदनशिवे, शंकर चंदनशिवे, विशाल वाघमारे, समाधान जाधव, नवनाथ गायकवाड, स्वप्निल सातपुते, आदी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages