वीज पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून महावितरण अभियंत्याचा सत्कार..!

महावितरणच्या कार्यालया समोर धरणे आंदोलनाचा दिला इशारा..!
कुर्डूवाडी( कटूसत्य वृत्त):- सतत च्या वीज खंडित पणा मुळे शेतकऱ्यांना बैलपोळा सण हा उत्सव म्हणून साजरा करता आला नाही.याच्या निषेधार्थ महावितरणच्या सहाय्यक अभियंता यांचा दालनात जाऊन संतप्त शेतकरी व नागरिकांनी त्यांचा कपाळी गंध लावून गळ्यात फुलांचा हार तर हातात पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन त्यांना सन्मानाची वागणूक देऊन विज सुरळीत व्हावी म्हणून गांधीगिरी पद्धतीने आदर सत्कार करून अनोखे आंदोलन केले.
खंडित वीज पुरवठा सुरळीत व्हावा व माढा फिडरचा खराब ब्रेकर दुुरुस्त करण्यात यावा या मागणीचा गेली सहा महिन्यापासून दखल घेतली जात नसल्याने कुर्डूवाडीतील लेंगरे वस्ती,चौधरी वस्ती,पारखे वस्ती व देवकते वस्ती येथील नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळाले गेल्या सहा महिन्यापासून अर्ज विनंत्या व पाठपुरावा करून देखील महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता पंकज पाटणकर यांना यश मिळत नाही हे पाहून हतबल शेतकरी नागरिकांनी अनोख्या पद्धतीने हे प्रेमळ आंदोलन छेडले.
लोकशाही पद्धतीने गांधी गिरीने केलेल्या आंदोलनाची तात्काळ दखल घेत अभियंता पाटणकर यांनी वरिष्ठ स्तरावर याचा पाठपुरावा करून बुधवार पर्यंत माढा फिडरचा खराब ब्रेकर दुुरुस्त करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.
अभियंता यांनी दिलेल्या मुदतीत वीज सुरळीत चालू झाली नाही तर गुरुवार दि.१ रोजी महावितरण च्या कार्यालयाला टाळे ठोकून धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन तात्काळ आंदोलकांनी अभियंता यांना दिले याच्या माहितीस्तव प्रती प्रांताधिकारी व कुर्डूवाडी पोलीस स्टेशन यांनाही देण्यात आल्या.
यावेळी मयूर खरात,शंकर बागल, धनाजी कोकरे,अतुल थिटे,बाळासाहेब भिसे,ज्ञानेश्वर बागल,दिपक लेंगरे,सिद्धेश्वर देवकते,मनोज लवटे,रामभाऊ देवकर,धनाजी जगताप,मोहन पारखे,रणजीत शिंणगारे,दीपक शिंगाडे,अरुण जगताप,संतोष गोफ़ने,मोहन लोंढे,बापू चौधरी,सचिन गवळी,प्रशांत खरात,सोमनाथ कुबेर,मोहन पारखे,सुनील पारखे,दिनेश लेंगरे,दत्ता गवळी,रवींद्र ठोंबरे आदींसह नागरिक व शेतकरी उपस्थित होते.
दीड महिन्यापासून माढा फीडर चा ब्रेकर ना दुरुस्त आहे तो पूर्णपणे बदलणे गरजेचे असल्याने कार्यकारी अभियंत्यांनी सदरच्या कॉन्ट्रॅक्टरला तश्या सूचना दिलेल्या आहेत तो पूर्ण ब्रेकर बदलण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरच्या म्हणण्यानुसार बुधवार पर्यंतचा वेळ लागेल.संतप्त नागरिकांच्या भावना वरिष्ठांना कळविण्यात आले आहेत यावर ते तात्काळ मार्ग काढतील. - पंकज राठोड (सहाय्यक अभियंता,महावितरण)
No comments:
Post a Comment