युतीचा निर्णय महाराष्ट्राला नवीन दिशा देण्याचं काम करेल : धनंजय डिकोळे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 27, 2022

युतीचा निर्णय महाराष्ट्राला नवीन दिशा देण्याचं काम करेल : धनंजय डिकोळे

युतीचा निर्णय महाराष्ट्राला नवीन दिशा देण्याचं काम करेल : धनंजय डिकोळे

कुर्डूवाडीत शिवसेना संभाजी ब्रिगेड युतीचा जल्लोष!

             कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी शिवसेना व संभाजी ब्रिगेडची युती महाराष्ट्रात जाहीर केली याचा आनंद कुर्डूवाडीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष करून साजरा करण्यात आला.

             प्रारंभी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष समीरभाई मुलाणी,शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांचा हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूड पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

             यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणाले सत्तेच्या काळात कोणीही जवळ येतं परंतु संकटाच्या समयी जवळ येणाऱ्यांची संख्या फार कमी असते मध्यंतरीच्या काळात लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या घटना घडल्या एक मुखी सत्ता किंवा एक हाती सत्ता मिळवण्यासाठी सत्तेचा ऊतमाज दाखवल्या जातोय स्थानिक किंवा प्रादेशिक पक्षांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न चालू केलाय हे लोकशाहीला घातक आहे संविधान बचवात्मक कार्य चालू करावे लागेल तरच लोकशाही टिकेल या एकाच विचाराने किंवा शिवरायांचे विचार तसेच प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचाराने भविष्यकाळात वाटचाल करूया पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी जो निर्णय घेतलाय तो इथून पुढे महाराष्ट्राला नवीन दिशा देण्याचं काम करेल अशी अपेक्षा यावेळी जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी बोलताना व्यक्त केली.

             यावेळी शिवसेनेचे गटनेते बबनरावजी बागल, युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन बागल संभाजी ब्रिगेडचे नेते दिनेश जगदाळे, हरिदास बागल,दिलीप सोनवर,तालुकाध्यक्ष बालाजी जगताप,शहर प्रमुख कुमार गव्हाणे,सुहास टोणपे, मनोज धायगुडे,धनराज पवार,श्रीकांत गायकवाड,अल्ताफ मुलाणी,राजाभाऊ व्यवहारे,विजयसिंह परबत,दिगंबर मिसाळ-पाटील भारत लटके,अविनाश पाटील,सचिन पराडे,पाटील,प्रभाकर गोरे,अरुण जगताप,अजिंक्य चव्हाण,योगेश मुळे अभयसिंह पाटील किरण जाधव,विजय काळे,जयसिंग जगताप,गणेश भोसलेरमण शेंडगे,आदींसह शिवसेना व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages