अनगर नगरपंचायत कार्यक्षेत्रात “हर घर तिरंगा” राबविण्यासाठी आढावा संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 1, 2022

अनगर नगरपंचायत कार्यक्षेत्रात “हर घर तिरंगा” राबविण्यासाठी आढावा संपन्न

अनगर नगरपंचायत कार्यक्षेत्रात “हर घर तिरंगा” राबविण्यासाठी  आढावा संपन्न

                मोहोळ (कटूसत्य वृत्त):-"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत "हर घर तिरंगा" उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी आज  दि. २९/०७/२०२२ रोजी दुपारी १२:०० वाजता अनगर नगरपंचायत, कार्यालय येथे मुख्याधिकारी अनुप अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली अनगर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व महाविद्यालये यांची जिल्हाधिकारी , सह आयुक्त नगरप्रशासन शाखा,जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या संदर्भात बेठक घेऊन भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने "हर घर तिरंगा" उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात  आली . 

                भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढायच्या स्मृती कायम तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरुपी लोकांच्या मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने आजादी का अमृत महोत्सव   देशभरात "हर घर तिरंगा" हा उपक्रम  राबविण्यात येत आहे. या  उपक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना दिलेल्या असून त्यामध्ये प्रत्येक शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापनावर तसेच प्रत्येक घर व इमारतीवर राष्ट्रध्वज उभारण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे व नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वतः विकत घेऊन लावणेसाठी त्यांना प्रेरित करण्यासाठी प्रयत्न करावे तसेच  राष्ट्रध्वज उभारण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा उपक्रम पोहोचवावा,असे आवाहन मुख्याधिकारी अनुप अग्रवाल यांनी केले.

                तसेच सर्व  शाळा व महाविद्यालयामध्ये "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत निबंध,वकृत्व स्पर्धा,रांगोळी व पथनाट्य स्पर्धा आयोजित करण्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले.

निबंध स्पर्धा:    दिनांक -०४ ऑगस्ट २०२२

गट १  - इ.१ली ते ५ वी   -

विषयाचे नाव –“माझा देश माझा अभिमान”

गट २  - इ.६ वी  ते  ८ वी   -

विषयाचे नाव –“आझादी का अमृत महोत्सव”

गट ३  - इ.९ वी  ते  १२ वी   -

विषयाचे नाव –“ आझादी का अमृत महोत्सव”

गट ४  - इ.६ वी  ते  ८ वी   -

विषयाचे नाव –“आझादी का अमृत महोत्सव : हर घर तिरंगा ”

वकृत्व स्पर्धा:      दिनांक -०५ ऑगस्ट २०२२

गट १  - इ.१ली ते ५ वी   -

विषयाचे नाव –“ हर घर तिरंगा”

गट २  - इ.६ वी  ते  ८ वी   -

विषयाचे नाव –“ हर घर तिरंगा”

गट ३  - इ.९ वी  ते  १२ वी   -

विषयाचे नाव –“ हर घर तिरंगा”

गट ४  - पदवी व खुला गट   -

विषयाचे नाव –“हर घर तिरंगा ”

रांगोळी स्पर्धा:  दिनांक -०६ ऑगस्ट २०२२

गट १  - इ.१ली ते ५ वी

गट २  - इ.६ वी  ते  ८ वी

गट ३  - इ.९ वी  ते  १२ वी

गट ४  - इ.६ वी  ते  ८ वी

गट ३  - इ.९ वी  ते  १२ वी

पथनाट्य स्पर्धा :   दिनांक -०९ ऑगस्ट २०२२

                दिनांक ०९ ऑगस्ट २०२२ रोजी “क्रांती दिन” यानिमित्त  अनगर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व महाविद्यालयांकडुन प्रभात फेरीचे आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले.याच बरोबर पथनाट्य सादरीकरण करण्यात येणार आहेत. 

                तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत अनगर नगरपंचायतकडे  उपलब्ध  झेंडे नागरिकांनी खरेदी करावे,असे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी अनगर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षक , नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages