बिनबुडाचा बिनाधाराचा तिवाडी बिघडवतोय बार्शीतली काँग्रेसची गाडी
तिवाडी सारख्याच्या स्व हितासाठी बार्शी काँग्रेस मध्ये सुरू झालेली गटबाजी पक्षाला न मानवनारी?
जिल्हा नेतृत्वाने वेळीच गटबाजी थांबवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे
संघटनेचा तयार झालेला चेहरा घालवणे पक्षाला मारक
बार्शी (कटूसत्य वृत्त):- कोणत्याही संघटनेला आश्वासक चेहरा महत्त्वाचा असतो जोपर्यंत आश्वासक चेहरा आणि एक पकड असलेले नेतृत्व पक्षाला मिळत नाही तोपर्यंत कोणतीही संघटना ही मृतप्राय असते. तशी ती अमूर्त असते अशा संघटनेला मूर्त स्वरूप द्यायचे असेल तर 'फेस ऑफ द पार्टी ' तयार होणे गरजेचे आहे. बार्शी काँग्रेसच्या माध्यमातून ॲड. जीवनदत्त आरगडे यांच्या रूपाने कोणत्याही राजकीय पक्षाला बार्शीच्या स्थानिक पातळीवर जे जमले नाही ते काँगेस पक्षाला आपसूक ॲड. जीवनदत्त आरगडे यांच्या रूपाने मिळाले होते. स्थानिक संदर्भ न विचारात घेता चाटूगीरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर विश्वास ठेऊन निर्णय घेतले तर पक्ष कसा रसातळाला जाऊ शकतो आणि पक्षाची पुरती वाताहत कशी होते. याची सुरुवात बार्शी तालुक्यातील काँग्रेस बाबतीत झालेली उघड उघड दिसून येत असल्याची चर्चा काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यातून चालू आहे.
ॲड. जीवनदत्त आरगडे हे यापूर्वीचे अध्यक्ष. आरगडे यांचा प्रसंगी आक्रमकता खिलाडू वृत्ती, प्रशासकीय सामाजिक प्रश्न सोडवण्याची पद्धत, वक्तृत्व, स्पष्ट वक्तेपणा परखड भूमिका प्रसंगी कोणाशीही दोन हात करण्याची धमक या बाबी एखाद्या पक्षाला कोचितच मिळतात. असा चेहरा पक्षाने किरकोळ कारणाने उपेक्षित ठेवणे संघटनेपासून दूर ठेवणे आकलनाच्या बाहेरचे आहे. असेही काँग्रेस कार्यकर्त्यातून बोलले जात आहे.
बार्शी तालुक्यातील सध्याची काँग्रेस पहाणारे तिवाडी नेमका आहे तरी कोण ..?
माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या आश्रयाला काही काळ स्वतःला मिरवून घेतलेले तिवाडी नामक चौथ्या फळीतला दुर्लक्षित बांडगुळ कार्यकर्ता म्हणून त्यांच्यावर टिका झाली होती.
त्यातच कसलीही काँग्रेस पक्षाची पार्श्वभूमी नसताना काँग्रेस मध्ये फिरत फिरत आलेले, सुशीलकुमार शिंदे यांचा निकटवर्ती आहे. असा बडेजावी आभास तयार करणारे, काँग्रेस मध्ये काड्या खोड्या करून पक्ष पदाधिकारी यांच्यामध्ये कारस्थाने करून गटबाजी जन्माला घालणारे व जे इतर कोणत्याही राजकीय पक्षात तिवाडी यांस जमले नाही ते काँग्रेस मध्येच करत असल्याचा आरोप काँग्रेसच्याच काही माजी पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
मुळात तिवाडी हे माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या शिवाय श्वास सुद्धा घेऊ शकत नव्हते. असाही आरोप केला जात आहे. पोटभरू उपक्रम करणा-या तिवाडी याना बहुतेक पक्षांनी अनवाणी अक्कडबाज आणि पक्षांतर्गत कुरापती आणि कारस्थाने करणारा सोफिस्टीकेटेड भंपकराव आहे. हे ओळखूनच दूर ठेवला आहे. हे काँग्रेस पक्षाला मात्र जमले नाही. असाही आरोप एका कट्टर काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे.
मागचे दोन्ही जिल्हा अध्यक्ष संतोष पाटील आणि प्रकाश पाटील यांनी त्याचा कावेबाजपणा ओळखूनच त्याला कधीही थारा दिलेला नव्हता. त्याची कारणेही अशीच होती. तिवाडी यांनी कधीही पक्षात कोणत्याही निवडणुकीत प्रचार करणे अथवा संघटना मजबुतीसाठी कार्य केल्याचे निदर्शनास आलेले नव्हते. तसेच कोणत्याही स्थानिक पदाधिकारी आणि जनतेची तिवाडी याची नाळ तुटलेली आहे. स्वतःचे महत्व वाढवण्यासाठी मोठमोठ्या बढाया मारणे मात्र प्रत्यक्षात कसलेही कार्य न करणे. देशासह राज्याचे नेते आले की शहरी शेठजी भटजी यांच्यासोबत रात्रीच्या शिळोप्याच्या अनौपचारिक गप्पा मारताना आपण किती मोठे चाणक्य आहोत आणि आपण किती शिल्पकार आहोत आणि नेत्याचे निष्ठावंत आहोत हे त्या त्या बैठकीत त्या त्या नेत्याला पोटात घुसणे आणि इतर आपल्याला ओळखून पक्षात थारा न देणारे कसे तकलादू आहेत. असे बड्या नेत्यांच्या कानात विषारी प्रदूषण करणे याशिवाय कोणतीही सांगावी अशी बाजू या तिवाडी याची नाही. असेही काँग्रेस कार्यकर्त्यातून बोलले जात आहे.
मुळात बार्शी शहरात ज्यांच्या सोबत हे तिवाडी नावाचे (----) राजकीय ओलीवर तग धरून राहिले. त्याच माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यासोबत असलेले विश्वास बारबोले हे यांनाही असेच अति महत्वाकांक्षी पणाचे डोस पाजून पाजून सोपल यांच्यापासून तोडून थेट बारामतीकर पवार यांच्याकडे सोपल हे राष्ट्रवादीचे राज्याचे नेते असताना नेले होते. त्यामुळे बारबोले यांना राष्ट्रवादीत स्थान तर मिळाले नाहीच. मात्र सोपल आणि बारबोले यांचे संबंध अकारण ताणले गेले. भविष्यात ते तुटलेही त्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना शिवसेनेत नेऊन त्यांचे तीन पिढ्यांचे नुकसान केले हेही या तिवाडी यांनीच केल्याचा त्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी दावा केला आहे. यात ना राष्ट्रवादीचा काही फायदा झाला ना सोपल यांचा ना बारबोले यांचा फायदा झाला. झाले ते सर्वांचे नुकसान झाले आणि याचे एकट्याचे महत्व वाढत राहिले कारण याच्या चाणक्य पणाचे तकलादू तात्पुरती भुरळ ही प्रासंगिक का असेना ही बारबोले याना पडली होतीच. त्याचे दूरगामी परिणाम हे आजही बारबोले यांना वाट्याला आलेले आहेत.
तेवढ्या काळात आपल्या आर्थिक गरजा मात्र भागवून तिवाडी यांनी बारबोले यांच्या राजकीय गरजेपोटी स्वतःचा पोटापाण्याचा धंदा मात्र भागवून घेतल्याचा आरोप केला जात आहे. या सगळ्या दुहीचे कारण हे एकमेव तिवाडी आहे त्यात कोणाचेही राजकीय बरे झाले नाही म्हणून चिडून तिवाडी याच्या घरावर सोपल समर्थकांनी चक्क विष्ठा भरलेली मडकी फोडली होती. असेही त्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर याने घाबरून बार्शीतून जो पळ काढला तो थेट सोलापूर येथे एका खाजगी दवाखान्यात नोकरी धरली. तिथे राहून राहून हळूच स्थानिक शेठजी भटजी यांच्या पदराआडून सुशीलकुमार शिंदे यांच्या सोबत आपण खास आहोत असा आभास तयार केला. मात्र राजकारण हे सगळे स्थानिक राजकिय कसोटीवर होत असते. त्यावेळी राजकीय नेते लोकमान्यता संघटन कसब आणि पाठिंबा हे सगळे बघत असतात. २०१४ मध्ये सुशीलकुमार शिंदेना भुरळ पाडून स्थानिक शेठजींच्या माध्यमातून हे तिवाडी जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदावर नेमले गेले. मात्र ज्या मूळ बार्शी तालुक्यातील हे आहेत त्या तालुक्यात मात्र याना पाठिंबा अभिनंदन सोडा याला तांब्याभर पाणी देणारे एकही घर सुद्धा नव्हते ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन तिवाडी याने बार्शीचे तत्कालीन शहर अध्यक्ष ॲड.जीवनदत्त आरगडे यांस भुरळ पाडली आपण कसे शिंदे यांचे निकटवर्ती आहोत. आपण कसे सोपल यांचे कारभारी होतो असे स्वतःचे चाणक्यी महत्व सांगून आरगडे यांच्या माध्यमातून बार्शीत पाय ठेवायला जागा तयार केली. आरगडे यांनी सुद्धा पक्षाने अनुभवी माणूस घेतला शिंदेंनी पक्षात घेतला असा विचार करून आरगडे यांनी सुद्धा त्यास उचित सन्मान दिला मात्र २०१६ च्या नगरपालिका निवडणुकीत तत्कालीन शहर युवक अध्यक्ष मोहसीन शेख यांस ऐन निवडणुकीत भरलेला अर्ज घेऊन तिवाडी याने ऐनवेळेस पळवून लावला त्यावेळी आरगडे यांनी त्याचा कावा ओळखला. २०१९ च्या बार्शीच्या पालिका निवडणुकीत माजी मंत्री दिलीप सोपल आणि तिवाडी यांच्यातील दुखऱ्या खुपर्यांचा पक्षाला फटका बसु नये म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या जागा वाटपाच्या बैठकांना त्यांना चर्चेत आणि विश्वासात आरगडे यांनी घेतलेच नाही. त्यात तिवाडी आणि सोपल यांच्या जुन्या ताणलेल्या संबंधाचा फटका बसु नये म्हणून स्पष्ट बोलून आरगडे यांनी तिवाडी यांस दूर ठेवले जागा बोलणी वाटप ठरले ते तिवाडी यांस समजल्यानंतर तिवाडी याने त्यात खोड काढली सोपल यांना भेटून चक्क निवडणुकीच्या नावाखाली पैशाची मागणी केली त्यामुळे चिडून जाऊन संतापाने सोपल यांनी तुमचे तुम्ही स्वतंत्र निवडणूक लढवा असे फटकारून दूर लोटले त्यामुळे काँग्रेसला स्वतंत्रपणे निवडणुकीला समोरे जावे लागले. त्यावेळी मात्र धसाला लागले की याने पुन्हा सोलापूर गाठले तो पुन्हा फिरकलाच नाही. असाही आरोप त्या काँग्रेस नेत्यांनी केला.
कोणतीही निवडणूक आली की सुगी आली अशा जीभळ्या चाटत निवडणुकीच्या संधीचा धंदा करता येतो का त्यासाठी आपले काहीही ऐकणारे सांगकामे पदाधिकारी तिवाडी यांस हवे असतात. तो संदर्भ घेऊन वैराग निवडणुकीत तिवाडी याना पुन्हा आरगडे यांनी बाजूला ठेवले आणि शिवसेना काँग्रेस आघाडी झाली. मात्र आरगडे यांनी मला एकटे पाडले याचा राग मनात धरून जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे आरगडे यांच्याबाबत कान भरणी सुरु केली. आगोदरच काँग्रेस पक्षाचे काम करणे हे बार्शी तालुक्यात मोठे आव्हान आहे कारण काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी मध्ये हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेला आहे. त्या मुळे मोठा नेता तयार होणे कठीण आहे. देश पातळीवर काँग्रेस पक्ष प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत आहे. त्यात असले बिनकामाचे बिनाधाराची वरिष्ठांची चापलूशी करणारे आयते श्रेय आणि कान खाणारे असल्याने पक्षात तरुण वर्गाला काम करणे सोयीचे नसले तरी आरगडे यांनी सर्वांच्या बैठकीत तिवाडी याना स्पष्टपणे सुनावले होते की तुमच्या व्यक्तिगत हेक्यामुळे पक्षाचे नुकसान होऊ नये. याची काळजी घ्या आणि निवडणुकीच्या काळात शांत रहा. स्वबळावर निवडणुका लढणे मोठे आव्हान आहे आणि ते बेअब्रू करणारी तसेच प्रसंगी काहीही हाती न लागणारे अवसानघात करणारे आहे. त्यामुळे आरगडे आणि तिवाडी यांच्यात 'तू तू मै मैं' झाली होती. त्यातच आरगडे आणि पोलीस निरीक्षक यांच्यात मार्च २०२२ मध्ये झालेली खडाजंगी आणि चक्क सुपा-या देऊन आरगडे यांचा पाडाव करण्यासाठी बदनामी करण्यासाठी सर्वच राजकीय पातळींवर षडयंत्र रचले गेले त्यायोगे आरगडे याना खोट्या केसेस मध्ये गुंतवले गेले असल्याचेही त्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितले. ती आयती नामी संधी तिवाडी याने हेरली आणि आरगडे हा पक्ष हिताचा असला तरी तिवाडी याच्या स्वार्थास बाधक आहे. हे ओळखून आरगडे यांच्यावर पक्षांतर्गत कार्यवाही करावी म्हणून शिवसेना, प्रहार, भाजप अशा लोकांना एकत्रित घेऊन जिल्हा अध्यक्ष याना दबाव टाकून कुरापत केली आणि आरगडे यांवर कार्यवाही केली गेली. असाही आरगडे यांनी केला आहे.
वास्तविक पाहता आरगडे यांच्या पोलीस वादाची किनार असलेल्या भांडणातून दाखल झालेले गुन्हे हे पक्षाने आरगडे यांची पाठराखण करायची सोडून आरगडे यांचे पक्षाने प्रसंगी अवसानघात केले. आणि कोणतीही बाजू ऐकून घेण्याची संधी न देता तांत्रिक किरकोळ गुन्ह्याची पक्षाला बदनामी होते. अशी आवई आणि कृत्रिम आभास तयार केला गेला आणि तिवाडी यांनी आरगडे यांच्या सोबत काम करीत असलेले शहर उपाध्यक्ष निलेश नाना मांजरे पाटील याना तुलाच आरगडे याच्या जागेवर अध्यक्ष करतो. असा बुद्धी भेद करून स्वप्न दाखवले त्यास मांजरे पाटील यांनी कावेबाज पणा ओळखून अनुमती दिली नाही. त्यानंतर जनसेवेचे वैभव पाटील यांनाही गळ घालण्याचा प्रयत्न केला मात्र पाटील यांनीही त्यास दुजोरा दिला नाही. दोघांनीही आरगडे यांच्यावर झालेला अन्याय चुकीचा आहे अशा वेळेला त्याला संधी समजणे म्हणजे किळसवाणा प्रकार आहे असेल प्रस्ताव पुन्हा देत जाऊ नका असे सुनावले. मग रेशनचा कला बाजार करणारा एक साधा पोरगा कोणताही काँग्रेस पक्षाचा विचार आचार इतिहास भूगोल माहीत नसलेला मात्र, स्वतःच्या सोयीचा होत आहे. असे ओळखून त्याला रेशन दुकानाच्या कार्ड धारकांना एक एक किलो गहू जास्त देतो आधार कार्ड काढून देतो आधार कार्ड रेशनकार्डला लिंक करून देतो अशी बोगस सभासद नोंदणीचा कांगावा खरा आहे असे भासवून पुढे करून आरगडे याच्या जागेवर रेटन्याचा प्रयत्न तीवडी अहोरात्र करीत आहे.
रेशन काळा बाजार करणारा साळुंके याने केलेले बावीसशे पैकी फक्त बावीस सभासद सुद्धा खरे नाहीत. याची पोलखोल करणारे बातम्या व्हिडीओ सुद्धा काहीजणांनी संकलित करून ठेवलेले आहे. हे एका बाजूला असले तरी आरगडे याचे पूर्वीचे पद पुन्हा हवे असेल आणि विरोध नको असेल तर आरगडे याना तिवाडी यांनी चक्क दोन लाख रुपये मागणी पदासाठी मागणी केली असल्याचेही आरगडे यांनी सांगितले.
जिल्हा अध्यक्ष माझा शब्द मोडू शकत नाहीत तो मोस्ट ज्युनियर आहे असे चित्र तयार केल्याने चिडून जाऊन आरगडे यांनी तिवाडी यांस शिव्या देऊन तिवाडी याचा तीन पिढ्यांचा उधार केला. मात्र यातून पक्षाच्या अंतगर्त न मानवणारी उभी फूट पडत आहे. यामध्ये जिल्हा अध्यक्ष यांनी यांचे अंतर्गत मतभेद समोर समोर बोलावून शिष्टाई करून दूर करणे गरजेचे होते जे अद्याप पर्यंत झालेले दिसत नाही.
आरगडे यांनी दिलेले योगदान कुरापतखोरांमुळे पक्षाने दुर्लक्ष करणे सोयीचे नाही. खांद्याला खांदा लावून कामे करणारे पक्षातील एकमेकांचे सहकारी पदाधिकारी एकमेकांना संपवून खांदा देण्याच्या तयारीत लागणे हे एकट्या तिवाडी याच्या आरगडे यांच्याबाबत असलेल्या व्यक्ती द्वेषामुळे आणि हेक्यामुळे, विशेष म्हणजे हे सगळे तिवाडीचे लाड जिल्हा अध्यक्ष गैरसमजातून करताहेत की तिवाडी धूळफेक करण्यास यशस्वी झाले याचे उत्तर कोण शोधणार..?
हा प्रश्न आहे. एकतर तरुण युवक वर्ग काँग्रेस पक्षापासून पाठ फिरवत असताना अरगडे यांच्या बाबत पक्षाने घेतलॆली भूमिका ही समर्थनीय नाहीच. असे अनाठायी गटबाजी वाढू न देणे हे पक्षासमोरील मोठे आव्हान आहे. अशाने पक्ष वाढणार तर नाहीच मात्र एकमेकांचे पंख कापताना पक्ष संघटना रस तळाला जाऊ नये याची काळजी काँग्रेस जणांनी घेतली पाहिजे. त्यासाठी फक्त बुद्धीभेद करणे आणि चाटूगिरी करून नेत्याच्या सोबत राहून राहून नेत्याच्या सोबतच्या चांगल्या सहकारी याना बुद्धीभेद करायला लावून त्यातील जरा बरा मासलेवाईक कार्यकर्ता शोधणे त्याला कुबड्या देऊन राजकीय गिर्यारोहण करायला उभा करणे बंड करायला लावणे आणि स्वतःची पोटापाण्याची सोय करणे असा चक्क पोटभरू धंदा करणाऱ्या प्रत्येक तालुक्यातील तिवाडी प्रवृत्तीला दूर ठेवणे हे जिल्हा नेतृत्वाचे कौशल्य आहे. असा सल्लाही काही जूण्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.
त्यासाठी अशा गटबाजी करण्यास खतपाणी घालणाऱ्या प्रवृतींना जिल्हा अध्यक्ष यांनी संघटनेपासून दूर ठेवावे आणि एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त अंतर्गत भांडणे विकोपाला जाण्या पूर्वी मध्यस्थी करणे गरजेचे आहे. असे न केल्यास काहीजन पक्षापासून लवकरच पाठ फिरावतील हे नक्की. तिवाडी यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

No comments:
Post a Comment