विद्यार्थी विकासासाठी मुख्याध्यापकांनी दशसुत्री कार्यक्रमाचा प्रभावी वापर करावा - सीईओ दिलीप स्वामी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 1, 2022

विद्यार्थी विकासासाठी मुख्याध्यापकांनी दशसुत्री कार्यक्रमाचा प्रभावी वापर करावा - सीईओ दिलीप स्वामी

विद्यार्थी विकासासाठी मुख्याध्यापकांनी दशसुत्री कार्यक्रमाचा प्रभावी वापर करावा - सीईओ दिलीप स्वामी

सायकल बँक साठी शिक्षक संघटनेकडून दिला एका लाखाचा धनादेश

                    सांगोला (जगन्नाथ साठे):- विदयार्थी विकास हाच विद्यार्थ्याचे भवितव्य उज्वल करू शकतो. शिक्षक हे विद्यार्थी विकासासाठी आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. समाजातील विविध घटकांचा विकास हा दूरगामी दिसून येत आहे. त्याचे श्रेय शिक्षकाना जाते.म्हणून वैयक्तिक जिल्हा परिषदेचा कुटुंब प्रमुख या नात्याने सर्वात जास्त लक्ष माझे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थी आणि शिक्षकांवर आहे.या पुढील काळात ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा, कोणतीही अडचण आली तर कधी ही कॉल करा. असा मौलिक सल्ला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले. कमलापुर ता सांगोला येथे तालुक्यातील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांसाठी आयोजित दशसुत्री कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते.या वेळी व्यासपीठावर प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर,प्रा तांबोळी सर, गटशिक्षणधिकारी नाळे साहेब, सिंहगड कॅम्पसचे अशोक नवले, शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आदि मान्यवर उपस्थित होते.

                    पुढे बोलताना स्वामी म्हणाले की,शिक्षण विभागाची वाटचाल धिम्या गतीने चालू आहे.पण येत्या काळात शिक्षण विभागच नाही तर सर्वच विभागाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल शासन स्तरावर घेतली आहे. शिक्षकाच्या कार्यकर्तुत्वामुळे हे सहज शक्य झाले आहे. दशसुत्री कार्यक्रमामुळे विद्यार्थ्याच्या अंगी गुणवत्ता विकास, शिस्त, संस्कार, विज्ञान निष्ठा, मूल्यशिक्षण,देशभक्ती आदि मूल्यांची जोपासना होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे दशसुत्री कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, कार्यकर्तृत्वात आणि विदयार्थी विकासात कसूरपणा दिसून आला तर मुख्याध्यापक,शिक्षक यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.

                    यावेळी शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दशसुत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने मुख्याध्यापकांना सूचना करून विदयार्थी विकासासाठी तळमळीने कार्य करावे, शाळा आणि विदयार्थी विकासासाठी ज्यादा वेळ द्या,तोच ज्यादा वेळ नक्कीच विदयार्थी विकासासाठी भविष्यात फायद्याचे ठरेल, असा विश्वास देवून मुख्याध्यापकांना प्रेरीत केले.

                    जिल्ह्यातील काही गावे आणि वाड्या वस्त्यावर शाळा दूर असल्याने मुलींना शाळेत जाण्यासाठीअडचणी येत होत्या.काही मुलींनी शाळा सोडून दिल्या होत्या. सीईओ स्वामी यांच्या  निदर्शनास ही गोष्ट येताच त्यांनी स्वत विद्यार्थिनीस दोन सायकली भेट दिल्या. जवळपास सायकल बँकेची संकलप्ना वाढीस लागली आणि जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींनी आणि सामाजिक संघटनांनी  सढळ हातानी मदत देण्यास सुरुवात केली आहे. सांगोला तालुक्यातील मुख्याध्यापक संघटनानी एक लाखाचा धनादेश स्वामी यांच्याकडे सुपूर्द केला.

                    आषाढी काळातील कार्य इतरांना प्रेरणा देणारे ठरले आहे.त्यामुळे आपण सर्वांनी इतरांना प्रेरणा देणारे कार्य केले तर इतरांसमोर आदर्श उभा राहील.अनेक महान व्यक्ती, संताच्या कार्याची उदाहरणे देवून वाचन संस्कृती रुजविण्याचा सल्ला ही या वेळी स्वामी यांनी दिला. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages