पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 9 ऑगस्टचा सोलापूर दौरा सिद्धेश्वरच्या बेकायदा चिमणी मुळे रद्द - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 9, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 9 ऑगस्टचा सोलापूर दौरा सिद्धेश्वरच्या बेकायदा चिमणी मुळे रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 9 ऑगस्टचा सोलापूर दौरा सिद्धेश्वरच्या बेकायदा चिमणी मुळे रद्द

                 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- 9 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूरचा दौरा रद्द झाला असून त्याचे प्रमुख कारण म्हणजे सोलापूरच्या होटगी रोड विमानतळास अत्यंत धोकादायक ठरवणारी शेजारील सिद्धेश्वर कारखान्याची बेकायदा को जनरेशन चिमणी ठरली आहे. 9 ऑगस्टलाच सोलापूर होटगी रोड विमानतळावरून उडान योजनेचे उद्घाटन करावे असे पत्र पीएमओ कार्यालय व सर्व संबंधित विभागांना सोलापूर विचार मंचच्या डॉ. संदीप आडके यांनी पाठवले होते परंतु चिमणी न पडल्याने हा दौरा रद्द झाला आहे. यास संपूर्णतः सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व आयुक्त पी शिवशंकर हे जबाबदार आहेत. 31 मे च्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या बेकायदा चिमणीची फेर सुनावणी घेऊन त्याचे तात्काळ पाडकाम करणे गरजेचे होते. त्यात आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी धर्मराज काडादी यांच्या तालावर नाचत कोणतीही सुनावणी घेतली नाही. परंतु डीजीसीए, नवी दिल्ली येथे चिमणी बाबतची सुनावणी होऊन तेथे सुद्धा 3 ऑगस्ट पर्यंत आपले म्हणणे मांडण्याची मुदत असून सुद्धा कारखान्याने आपले म्हणणे आजतागायत दिले नाही , त्यामुळे 28 ऑगस्ट पर्यंत चिमणी पाड कामावर डीजीसीए नवी दिल्ली हे कठोर निर्देश देणार आहेत असे डीजीसीए ऑफिस मधून मला सांगण्यात आल्याचे डॉ.आडकेयांनी सांगितले. या बेकायदा चिमणीमुळे डीजीसीए सोलापूरच्या सुसज्ज होटगी रोड विमानतळास नागरी उड्डाण करण्यास परवानगी देत नाही. या संपूर्ण प्रकरणामुळे सोलापूरचे आयुक्त व जिल्हाधिकारी तसेच धर्मराज काडादी यांच्यावर प्रचंड दबाव आल्याचे खात्रीलायकरीत्या बोलले जात आहे. त्यामुळे सिद्धेश्वरच्यी चिमणी पुन्हा एकदा सोलापूरच्या प्रगतीमध्ये कसा अडसर आणत आहे हे सिद्ध झाले आहे व हे सर्व प्रकरण सोमापा आयुक्त, जिल्हाधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अंगलट येणार आहे असे खात्रीलायकरीत्या सोलापूर विचार मंचच्या सदस्या तर्फे सांगितले जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages