न्यू लाइफ हॉस्पिटलमध्ये किलेशन उपचार थेरपी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 9, 2022

न्यू लाइफ हॉस्पिटलमध्ये किलेशन उपचार थेरपी

न्यू लाइफ हॉस्पिटलमध्ये किलेशन उपचार थेरपी

                  सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुरातील मंगळवार बाजार येथील मच्छी मार्केट समोर असलेल्या न्यू लाईफ हॉस्पिटलमध्ये हृदयरोग व हृदयातील ब्लॉकेजेससाठी किलेशन व ओझोन उपचार थेरपी उपलब्ध असल्याची माहिती डॉ. नसीर खान यांनी पत्रकार परिषदेत दिली. सर्व सुविधांनीयुक्त सुसज्ज असलेल्या या हॉस्पिटलमध्ये 25 बेड, आयसीयू, रुग्णवाहिका, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, पॅथॉलॉजी लॅब यासह सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच गरीब व सर्वसामान्य रुग्णांसाठी अल्प दरात उपचारसुद्धा उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. सर्व विषयांचे तज्ञ डॉक्टर्स देखील सुसज्ज स्टाफसह या ठिकाणी उपलब्ध आहे आणि ते रुग्णांना परिपूर्ण सेवा देतील याची खात्रीही त्यांनी दिली. बायपास सर्जरी टाळण्यासाठी किलेशन थेरपी व मोफत तपासणी शिबिर दिनांक ९ ऑगस्ट २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली असून स.१० ते ०२ या वेळेत रुग्णांनी मोफत तपासणीसाठी यावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी संधिवात, कॅन्सर, ब्लडप्रेशर, शुगर इ. समस्यांवर हमखास इलाज. नाव नोंदणीसाठी 77 58 86 0950 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. या पत्रकार परिषदेसाठी डॉ. कल्पना नानजकर, डॉ. प्रकाश घटोळे, डॉ. जिलानी खान, डॉ. रमेश अग्रवाल आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages