शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात सामिल...


राहुल शेवाळे गटनेता तर भावना गवळी प्रतोद
मुंबई, (नासिकेत पानसरे):- शिवसेनेच्या १२ खासदारांनी आज शिंदे गटात सामिल झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत एका पत्रकार परीषदेत सांगितले.यावेळी १२ खासदारांचा वेगळा गट करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्र या खासदारांच्या वतीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.यावेळी गट नेते म्हणून राहूल शेवाळे,तर प्रतोद भावना गवळी यांची झाल्याचेही त्यांनी सांगितले. आपण भाजपा सोबत निवडणुक लढविली आहे. आपण त्यांच्या सोबत युती म्हणूनच पाहीजे असे अनेकदा सांगण्याचे प्रयत्न झाले खासदारांच्या वतीनेही प्रयत्न करण्यात आले.पण यश आले नाही म्हणून आमदारांच्या नंतर खासदारांनी बंड केल्याचे शिंदे म्हणाले.
आपण उद्या ओबीसी आरक्षण संदर्भात सुप्रिम कोर्टात केस आहे. त्याबाबत कायदे तज्ञांशी चर्चा करण्यासाठी आपण दिल्लीत आल्याचे शिंदे सांगितले. तसेच आमचे गटनेते आणि प्रतोद यांचे स्वागत करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले.राज्यात ५० आमदारांनी वेगळा गट करून भाजप सोबत जाण्याची भूमिका घेतली.त्यांचे समर्थन केल्याचे सांगितले.त्यानुसार लोकसभेत १२ खासदारांनी मिळून भाजपा सोबत एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.यावेळी सदाशिव लोखंडे, संजय मंडलिक,धैर्यशिल माने,राजेंद्र गावित, हेमंत गोडसे, श्रीकांत शिंदे,राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव,कृपाल तुमाने,श्रीरंग बारने,हेमंत पाटील आणि भावना गवळी हे १२ खासदार यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment