ग्रा.प लोणी काळभोर उपसरपंच पदी भारती राजाराम काळभोर यांची बिन विरोध निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 20, 2022

ग्रा.प लोणी काळभोर उपसरपंच पदी भारती राजाराम काळभोर यांची बिन विरोध निवड

ग्रा.प लोणी काळभोर उपसरपंच पदी भारती राजाराम काळभोर यांची बिन विरोध निवड

                 लोणी काळभोर (कटूसत्य वृत्त):- दि.१९/७/२०२२ रोजी ग्रामपंचायत लोणी काळभोर उपसरपंच पदी भरती राजाराम काळभोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच माधुरी राजेंद्र काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली आज ग्रामपंचायतीची विशेष सभा घेण्यात आली. या सभेत भारती राजाराम काळभोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.लोणी काळभोर ग्रामपंचायत ही अतिशय वेगाने होणाऱ्या कामाने म्हणून संपूर्ण तालुक्यात ओळखली जाते. या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या १७ आहे. त्यामुळे उपसरपंच. या पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत भारती राजाराम काळभोर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची उपसरपंच पदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येणाऱी विकास कामे दलित व आदिवासी वस्तीतील प्रलंबित कामे, गावातील रस्ते, पाणी योजना, स्वच्छता ही कामे अग्रक्रमाने हाती घेऊन स्वच्छ लोणी व सुंदर लोणी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानस  ज्येष्ठ नेते माधव दत्तात्रय काळभोर यांनी बोलून दाखविला आहे. डिजिटल ग्रामपंचायत वैद्यकीय सुविधा, व्यायाम शाळा, वाचनालय,आरोग्याचे प्रश्न, वाडी वस्ती वरील रस्ते आदी प्रश्नांना प्राधान्य देण्यात येणार आहे  असे मत मा.उपसभापती यूगंधर मोहन काळभोर यांनी मांडले.उपसरपंच निवडा नंतर समर्थकांनी गुलालांची व फटाक्यांची आतिषबाजी  आनंद साजरा केला.

गावातील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ मंदीर देवाचे दर्शन घेतले

                 त्याप्रसंगी सत्कार करताना श्री.माधवआण्णा काळभोर (जि.प.सदस्य), पै.राहुल भाऊ काळभोर (महाराष्ट्र केसरी), शिवदास बापू काळभोर (अध्यक्ष हवेली ता.कॉं.पार्टी), सुभाषआप्पा काळभोर (चेअरमन साधना सह.बँक.लि.), सनीशेठ काळभोर (उपसभापती पं.स.हवेली), आण्णासाहेब काळभोर (उपसरपंच), सीताराम भाऊ लांडगे (अध्यक्ष-मराठी पत्रकार संघ जिल्हा पुणे), सुर्यकांत आप्पा काळभोर, सुनंदा आप्पासो काळभोर  (मा.उपसरपंच), राजेंद्र काळभोर (उपसरपंच), अमित भाऊ काळभोर (उपाध्यक्ष हवेली तालुका रा.कॉ.पार्टी), युवराज काळभोर (अध्यक्ष वन व्यवस्थापन समिती), पै महेश काळभोर (मालोबा केसरी), सरपंच सौ.माधुरीताई राजेंद्र काळभोर, मा.सरपंच विद्यमान ग्रा.पं. सदस्य श्री.राजाराम विठ्ठल काळभोर, मा.उपसरपंच सौ.संगीताताई सखाराम काळभोर, ग्रा.पं. सदस्य श्री.योगेशनाना काळभोर, नागेश काळभोर, भरत काळभोर, गणेश कांबळे, राहुल काळभोर, ग्रा.पं. सदस्या सौ.साविताताई गीताराम लांडगे, प्रियांकाताई सचिन काळभोर, ललिताताई राजेंद्र काळभोर, ज्योतीताई अमित काळभोर, रत्नाबाई राजाराम वाळके, तसेच गीताराम लांडगे, सागर काळभोर, सचिन काळभोर, आप्पासाहेब काळभोर, ग्रामविकास अधिकारी श्री.जे.एच. बोरावणे, ग्रामपंचायत कर्मचारी पत्रकार अनिकेत मुळीक इतर मान्यवर आणि समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

                  मान्यवरांनी नवनिर्वाचित उपसरपंच भारती राजाराम काळभोर  यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages