मनीष काळजे व प्रशांत भोसले जिल्ह्यात शिंदेगट मजबूत करतील अशी अपेक्षा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 9, 2022

मनीष काळजे व प्रशांत भोसले जिल्ह्यात शिंदेगट मजबूत करतील अशी अपेक्षा

मनीष काळजे व प्रशांत भोसले जिल्ह्यात शिंदेगट मजबूत करतील अशी अपेक्षा


              मोहोळ (कटूसत्य वृत्त):- कट्टर शिवसैनिक अशी ओळख असणारे प्रशांत बापू भोसले व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंड नसून तो स्वाभिमानासाठी केलेला उठाव आहे. आणि हा निर्णय योग्य आहे. अशी गर्जना करणारे मनीष काळजे ही जोडगोळी जिल्ह्यात स्वाभिमानी शिवसैनिकांच्या मदतीने शिंदे गट मजबूत करतील अशी अपेक्षा बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांना आहे.

              प्रशांत भोसले व मनीष काळजे  या दोघांनी  आपल्या सामाजिक जीवनाची सुरुवात शिवसैनिक म्हणून केली.अनेक अडचणी आल्या अनेक वेळा संघर्ष करावा लागला मात्र शिवसेना कधी सोडली नाही.  कष्टकरी गरीब जनतेच्या  समस्या सोडविण्याचे एक मध्यम म्हणजे शिवसेना होती परंतू आयुष्यभर ज्या विचारांना विरोध केला.ज्यांच्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या संकटे आली. अश्या विचारांबरोबर नेतृत्व गेले. त्यामुळे धर्म संकटात सापडलेल्या शिवसैनिकांना बाहेर काढण्यासाठी  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारातून घडलेले नेतृत्व  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव केला खरं म्हणजे सामान्यांची दुःखे जाणून घेणारे व त्यावर तात्काळ मार्ग काढून तो प्रश्न ती समस्या सोडविणारे , कार्यकर्त्याला बळ देणारे , कसलीही अडचण मांडण्यासाठी वेळ न घेता जरी गेले तरीसुद्धा त्या कार्यकर्त्याला भेटून त्याची समस्या सोडविणारे नेतृत्व म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होय यांच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी भरघोस निधी मिळवून जिल्ह्यात  शिंदे गट मजबूत करतील अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेच्या आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages