बेंद ओढ्याचे सुमारे ३४ किमी लांबीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 9, 2022

बेंद ओढ्याचे सुमारे ३४ किमी लांबीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण

बेंद ओढ्याचे सुमारे ३४ किमी लांबीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम पूर्ण

धनराज शिंदेंच्या नेतृत्वाखालील राज्यातील हा पहिला उपक्रम

               कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- माढा वेल्फेअर फौंडेशन,निमगाव (टे) या संस्थेने तीन वर्षापूर्वी हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी बेंद ओढा  खोलीकरण व रुंदीकरण प्रकल्पाचे काम आता पूर्ण झाले असून सुमारे ३४.५ किमी लांबीच्या या ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण झाले आहे. राज्यात प्रथमच लोकसहभाग,सरकारी संस्था आणि खाजगी संस्था यांच्या भागीदारीतून हे काम हाती घेण्यात आले होते. 

               माढा वेल्फेअर फौंडेशनचे अध्यक्ष धनराज शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या प्रकल्पाला जिल्हा परिषद सोलापूर, नाम फौंडेशन, पुणे, मुकुल माधव फौंडेशन, पुणे यांनी व यासारख्या इतर काही खाजगी संस्थांचे अत्यंत मोलाचे आर्थिक सहकार्य लाभले आहे.माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे व करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करत शासन स्तरावर या प्रकल्पासाठी पाठपुरवा करून आवश्यक त्या सर्व बाबीची पूर्तता केल्याने हा अवघड प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात यश आले असल्याची भावना धनराज शिंदे यांनी बोलून दाखवली.ओढ्यालगतच्या शेतकऱ्याप्रती कृतज्ञाता वक्त करत ते पुढे म्हणाले,याकामी शेतकऱ्यांनी बहुमोल सहकार्य केल्यानेच प्रकल्पाचे काम वेगाने करण्यात आपली संस्था यशस्वी झाली.

               या प्रकल्पाचा लाभ ढवळस, पिंपळखुंटे,चौभे पिंपरी,कुर्डू, कुर्डूवाडी,भोसरे,वडाचीवाडी,वेताळवाडी,रणदिवेवाडी,वडशिंगे,उंदरगावमहातपूर या गावांना होत असून या गावातील लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून ओढ्यालगताच्या सुमारे ६२ हजार एकर कोरडवाहू शेतजमिनीला शाश्वत पाणी उपलब्ध होणार आहे. या कामामुळे बेंद ओढ्याला नदीचे स्वरूप आले असून ओढ्या काठचा भाग सुजलाम सुफालम होण्यास सुरुवात झाली आहे.यामुळे एकंदरच ओढा लगतच्या शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

               माढा वेल्फेअर फौंडेशन या संस्थेचे संस्थापक धनराज शिंदे यांनी हजारो शेतकर्यांसाठी जो जलसंधारणाचा बेंद ओढा खोलीकरण व रुंदीकरणाचा प्रकल्प हाती घेऊन यशस्वीरीत्या पूर्णत्वाला नेल्याने शेतकर्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून जिरायीत शेतीचे बागायत शेती मध्ये रुपांतर झाले आहे. - श्रीकांत कोरे 

               ज्या वयामध्ये राजकारणाकडे तरुणाईचा कल असतो त्याच वयामध्ये माढा वेल्फेअर फौंडेशन या संस्थेचे संस्थापक धनराज शिंदे यांनी समाजासाठी व समाज उपयोगी कामावरती भर दिला व बेंद ओढा हा प्रकल्प पुर्णत्वाला नेऊन शेतकर्यांच्या जिवना मध्ये नवसंजीवनी निर्माण करण्याचे काम केले आहे. - अमोल खरात

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages