बेंबळे नगरीत आषाढी एकादशी भक्ती भावाने साजरी

बेंबळे (कटुसत्य वृत्त): बेंबळे नगरीत आषाढी एकादशी उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्त येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटे राकेश रत्नाकर कुलकर्णी व त्यांच्या सुविद्य पत्नी रेणुका राकेश कुलकर्णी यांचे हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्यात आली, मंदिराचे सेवाधारी पुजारी राजू संत यांनी पौरोहित्य केले. यानंतर मंदिरात टाळ, मृदंग, विणा यांच्या आवाजात भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला, याप्रसंगी अनेकांनी अभंग व देवाची गाणी सादर केली. दुपारी येथील ज्येष्ठ पत्रकार मुकुंद रामदासी यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची आरती करण्यात आली,व त्यानंतर उपवासाच्या पदार्थांचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. अनेक भाविकांनी एकादशीनिमित्त फळे व उपवासाच्या पदार्थाचे नैवेद्य विठ्ठल रुक्मिणी चरणी अर्पण केले . याप्रसंगी सुभाष भोसले, संजय जोशी, नामदेव भोजने, दत्ता गोडसे, हनुमंत लोंढे, भारत भोसले, भाऊ गुरव, धनंजय कदम, सौदागर लोंढे, ऋषी जोशी, गणेश हुलगे, गणेश टकले, बबन शेळके, गोपाळ काळे, विठ्ठल मदडे, ज्ञानदेव लोंढे, मनोहर पवार ,वामन भोसले ,अभयसिंह भोसले यांचे सह अनेक स्त्री पुरुष भाविक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment