विठ्ठल नामाची शाळा भरली...!



बेंबळे - हरीनगर येथील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा नयनरम्य रिंगण सोहळा...
बेंबळे (कटुसत्य वृत्त): बेंबळे- हरीनगर येथील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आषाढी एकादशी दीवशी नयन रम्य रिंगण सोहळा व दिंडी सहित पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सकाळी शाळेच्या मैदानावर पालखी पूजनाचा सोहळा संस्थेचे अध्यक्ष पोपटराव अनपट सरपंच विजय पवार प्राचार्य प्रभाकर सचिव इंगळे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यानंतर पंढरपुरच्या वारीप्रमाणेच रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता, मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तूळशी वृंदावन, वृक्ष , ग्रंथ देण्यात आले होते.
एरवी शाळेच्या गणवेशात असलेली मुलं मुली आज मात्र पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ आणि नऊवारी साड्या नेसून आलेल्या मुली, केसात गजरा, डोक्यावर तुळस आणि "विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली" या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात अवतरले होते. यावेळी ज्ञानाच्या मंदिरात विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर होत होता अन अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाल्याचे मनोहर दृश्य पाहायला मिळत होते. या अनोख्या रिंगण सोहळ्यात लेझीम,वृक्षदिंडी , टाळ दिंडी, आरोग्य दिंडी, पताका दिंडी, वृक्ष दिंडी , तुळशी वृंदावन दिंडी ,ग्रंथ दिंडी या सर्वांचा समावेश करण्यात आलेला होता.तसेच विद्यार्थी आणि शिक्षकानी पारंपारिक वारकरी वेशभूषा, व हातात भगवा ध्वज घेऊनअभंगाच्या ठेक्यावर फुगड्या खेळत आनंद व्यक्त केला . रिंगण आटोपल्यावर टाळ मृदुंगाच्या गजरात विठूरायाची आरती होऊन बेंबळेगावा मध्ये पालखीची भव्य नगर प्रदक्षिणा काढण्यात आली.यामधे प्रशालेचे इयत्ता ३ री ते १२ वी पर्यंत चे विद्यार्थी , प्राचार्य प्रभाकर शिक्षक व शिक्षिका हरिनामाचा गजर करत सहभागी झाले होते.या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख भिंगारदिवे , लांडगे व कीर्ते मॅडम यांनी केले होते., सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment