सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लाटे यांनी आपला वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करून अनाथांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद...! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 11, 2022

सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लाटे यांनी आपला वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करून अनाथांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद...!

सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लाटे यांनी आपला वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा करून अनाथांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद...! 

                   बोरघर / माणगाव (कटुसत्य वृत्त): पोलिस म्हटले की त्यांचे धवापळीचे जीवन, ते नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सतत कार्यरत असतात. स्वतःबरोबरच कुटुंबियांकडेही त्यांना लक्ष द्यायला वेळ नसतो. पण, नवी मुंबई पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले स्वप्नील लाटे यांनी आपला वाढदिवस आदिवासी कर्णबधिर-मतिमंद निवासी विद्यालय व साई आश्रय निराधार वृद्धाश्रमात  साजरा केला. 

                   नवी मुंबई पोलीस दलातील जलद प्रतिसाद पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले पोलिस अधिकारी स्वप्नील लाटे यांचा शनिवारी ९ जुलै रोजी वाढदिवस होता. त्यांनी वाढदिवस कोप्रोली येथील कै.रामचंद्र कुरुळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था आदिवासी कर्णबधिर-मतिमंद निवासी विद्यालयातील मुलांना क्रिकेट खेळाचे साहित्य, तसेच भेटवस्तू देऊन त्या ठिकाणी वाढदिवस साजरा केला.  त्याचबरोबर नवीन पनवेल येथील साई आश्रय या निराधार वृद्धाश्रमात साजरा केला. या वेळी  निराधार वृद्ध, महिला, पुरुष यांना भेटवस्तू, फळे व मिठाईचे वाटप करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे वृद्धाश्रमातील नागरिकांच्या चेहऱयावर आनंदाची झळक होती. 

                   यावेळी स्वप्नील लाटे अर्थात अनाथांच्या नाथाला या सर्वांनी वाढ दिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या. त्याच बरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लाटे हे वेळोवेळी गोरगरिबांना मदतीसाठी धावत असतात. पालघर येथील मोखाडासह इतर ठिकाणी गोर-गरीब व लहान मुलांना त्यांना आवश्यक असणाऱ्या साहित्य, भेटवस्तू, शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य भेट म्हणून देत असतात. 

                   गोर-गरिबासाठी धावणाऱ्या  पोलीस निरीक्षक स्वप्नील लाटे यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त अनावश्यक खर्च टाळून चांगल्या कामासाठी खर्च केला. ते म्हणाले, 'वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून चांगल्या कामासाठी दान केल्याने मला समाधान मिळाले आहे. हा आनंद काही वेगळाच असतो.' यावेळी साई आश्रय वृद्धाश्रम चे किरण पाटील, ज्योती पाटील, आदिवासी कर्णबधिर व मतिमंद निवासी विद्यालयाचे सौ.ललिता कुरुळकर, प्रफुल चुनेकर, मनोज कुरुळकर, यांच्यासह जलद प्रतिसाद पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल अनिकेत कुंभार, पत्रकार केवळ महाडिक, रवींद्र गायकवाड, संतोष आमले, अनुराग वाघचौरे इत्यादी उपस्तित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages