द्रौपदी मुर्मू यांची निवड आदिवासी महिलांचा सन्मान : आमदार उमा खापरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 21, 2022

द्रौपदी मुर्मू यांची निवड आदिवासी महिलांचा सन्मान : आमदार उमा खापरे

द्रौपदी मुर्मू यांची निवड आदिवासी महिलांचा सन्मान : आमदार उमा खापरे



भाजप चिंचवडगाव किवळे मंडळाचा आनंद उत्सव

                    पिंपरी, (कटुसत्य वृत्त): जगातील सर्वात मोठा लोकशाही देश भारत आहे. या बहु संस्कृतीने नटलेल्या देशाच्या सर्वोच्च पदावर आदिवासी महिलेला निवडून देणे हा सर्व महिलांचा सन्मानच आहे असे प्रतिपादन आमदार उमा खापरे यांनी केले.

                    भाजपा चिंचवड विधानसभा प्रमुख शंकर जगताप म्हणाले की, भारताच्या राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर आदिवासी समाजाच्या द्रौपदी मूर्मु यांची निवड झाली आहे. याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे. द्रौपदीजींनी आपले संपूर्ण आयुष्य वंचितांच्या उन्नतीसाठी समर्पित केले आहे. त्यांच्या धोरणाचा आणि प्रशासकीय अनुभवाचा देशाला फायदा होईल असे शंकर जगताप म्हणाले.

                    एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांची निवड होण्याचे निश्चित होताच गुरुवारी ( दि. २१ जुलै २०२२) भाजपा चिंचवड - किवळे मंडलातर्फे ज्येष्ठ नेते आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा चिंचवड विधानसभा प्रमुख शंकर जगताप, आमदार व महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार उमाताई खापरे , माजी महापौर माई ढोरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे संयोजक बाळासाहेब ओव्हाळ, बिभीषण चौधरी, मनोज तोरडमल, पल्लवी वाल्हेकर, आदेश नवले, निलेश भोंडवे, योगेश कांबळे, अनिकेत क्षीरसागर यांनी  'विजय उत्सव' साजरा केला. यावेळी आदिवासी बांधवांच्या नृत्याचा देखील कार्यक्रम घेण्यात आला.

                    ममीली चौक, गुरूद्वार रोड, वाल्हेकरवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात माजी उप महापौर सचिन चिंचवडे, माजी नगरसेवक शत्रुघ्न  काटे, मोरेश्वर शेडगे,

                    भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष संकेत चोंधे, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष उज्वला गावडे, व चिंचवड - किवळे मंडलाचे अध्यक्ष योगेश चिंचवडे, शहराध्यक्ष शेखर चिंचवडे, विनोद मालु आदी पदाधिकारी  व कार्यकर्ते उपस्थित होते.

                    यावेळी आ. उमा खापरे म्हणाल्या की, द्रौपदी मूर्मू यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण कार्य अव्याहतपणे सुरू ठेवले. आपले पती व मुलांच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवून त्यांनी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्वतःचे राहते घर शाळेमध्ये रूपांतरित केले. आजही त्या मुलाच्या व पतीच्या स्मृतीदिनानिमित्त त्या ठिकाणी जाऊन शिक्षणाचे महत्त्व नागरिकांना पटवून देतात. त्यांचा राजकीय व प्रशासकीय अनुभव देशाच्या विकासासाठी निश्चितच फायदेशीर ठरेल. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने द्रौपदी मुर्मु यांची निवड निश्चित केली असेही आमदार उमा खापरे म्हणाल्या.

                    प्रास्ताविक मनोज तोरडमल, सूत्रसंचालन बिभिषण चौधरी, आभार आदेश नवले यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages