कमलापूर गावचे सरपंच सौ. कलावती बंडगर यांना सोलापूर जिल्ह्याचा आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर

सांगोला (कटुसत्य वृत्त): कमलापूर गावच्या कर्तव्यदक्ष सरपंच सौ.कलावती धोंडीराम बंडगर युवा नेते बाबुराव (बी.आर) भाऊ बंडगर यांच्या मातोश्री आहेत. त्यांना नवभारत या वर्तमानपत्राचा आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाला. त्या 2014 ते 2019 या कालखंडामध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या. त्यानंतर जनतेने 2019 आली भरघोस मतांनी निवडून दिले.व त्या सरपंच झाल्या.त्या सोलापूर जिल्ह्याच्या सरपंच संघाच्या महिला उपाध्यक्षा आहेत.त्यांनी केलेल्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये तळागाळातील लोकांची जनसेवा कोरोनाच्या काळामध्ये केलेलं भरीव काम एवढेच नव्हे तर गेल्या दोन वर्षांमध्ये विविध लोकोपयोगी शिबिरे आरोग्य शिबिरे वृक्ष लागवड, रक्तदान शिबिर तसेच कमलापूर गावामध्ये विकास कामांचा धडाका त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र श्री.बाबुराव बंडगर यांचे सुद्धा मुलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. ग्रामपंचायत कमलापूरचे सर्व सदस्य सर्व ग्रामस्थ यांचेही मुलाचे योगदान लाभले. पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
No comments:
Post a Comment