आघाडी सरकार मधील प्रलंबीत प्रश्नाची सोडवणूक शिंदे फडणविस सरकार करेल का ? - माजी खासदार हरिभाऊ राठोड

मुंबई, (नासिकेत पानसरे):- मागासवर्गीयांचे बढती मधील आरक्षण, भटके विमुक्त आणि, बारा बलुतेदारांना क्रिमिलियर संज्ञेमधून वगळणे, मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्यासाठी मेगा भरती, भटके विमुक्तांचा आरक्षण मधील अंतर - परीवर्तनाचा प्रश्न, भटके विमुकतां साठी वसतिगृह आणि शिष्यवृत्ती असे अनेक इतर प्रश्न आघाडी सरकार असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पोट तिडकीने मांडत होते. त्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक शिंदे फडणवीस सरकार करणार का असा सवाल माजी खासदार भटक्या विमुक्तांचे नेते हरीभाऊ राठोड यांनी केला आहे.
आघाडी सरकारच्या कार्यकाळात मागासवर्गीयांचे अनेक प्रश्न जाणीवपूर्वक न सोडविता मागासवर्गीय घटकावर अन्याय केला, हे सर्वश्रुत आहे. देवेंद्र फडणवीस हे मागील सरकार मध्ये विरोधी पक्षनेते असताना त्यांनी अनेक प्रश्न पोटतिडकीने विधान सभेत मांडले, अनेक प्रश्न पैकी अत्यंत महत्वाचे म्हणजे मागासवर्गीयांचे बढती मधील आरक्षण, भटके विमुक्तआणि, बारा बलुतेदारांना क्रिमिलेअर संज्ञा मधून वगळणे, मागासवर्गीयांचा अनुशेष भरण्यासाठी मेगा भरतीचा प्रश्न, भटके विमुक्तांचे आरक्षण मधील अंतर - परीवर्तनाचा प्रश्न, भटके विमुकतां साठी वसतिगृह आणि शिष्यवृत्तीचा प्रश्न आणि इतर अनेक प्रश्न शिंदे फडणविस सरकारने लवकरात लवकर सोडवावे अशी माफक अपेक्षा मागासवर्गीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे, ओबीसींचा राजकीय आरक्षनाचा प्रश्न जसा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोडवले त्याच प्रमाणे हे प्रलंबीत प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावे अशी मागणी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment