द्रौपदी मुर्मू यांची विजयी वाटचाल, भाजपा प्रदेश कार्यालयात जल्लोष




मुंबई, (कटुसत्य वृत्त): राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी मतमोजणीत निर्णायक आघाडी घेतल्यानंतर गुरुवारी दुपारी मुंबईत भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयाच्या समोर भाजपा कार्यकर्त्यांनी व आदिवासी बांधवांनी जल्लोष केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या जल्लोषात आदिवासी वाद्यांच्या तालावर नाचून आणि मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन, प्रदेश उपाध्यक्ष राज पुरोहित व चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. तमिळ सेल्वन व प्रदेश प्रवक्ते अतुल शाह यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment