प्रहार संघटनेकडून मोफत पशुचिकित्सा, लसीकरण, औषधांचे वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 7, 2022

प्रहार संघटनेकडून मोफत पशुचिकित्सा, लसीकरण, औषधांचे वाटप

प्रहार संघटनेकडून मोफत पशुचिकित्सा, लसीकरण, औषधांचे वाटप

आमदार बच्चू कडू यांचा वाढदिवस अनोख्या उपक्रमांनी साजरा

               लऊळ(कटुसत्य वृत्त): सर्वसामान्यांच्या ज्ञाय हक्कासाठी सदैव तत्पर असणाऱ्या प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू व प्रहारचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे यांच्या वाढदिवसाचे औचित्य  साधून  मोफत पशुचिकित्सा, लसीकरण व औषधांचे वाटप करण्यात आले. 

               कार्यक्रमाचे उद्घाटन प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता म्हस्के व माढा तालूका पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रताप नलवडे यांच्या हस्ते करण्यात आले. जनावरांचे आरोग्य जपण्यासाठी करावे लागणारे उपाय व पशुपालंकासाठी विविध शासकीय योजना याविषयी गावचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन मोरे यांनी उपस्थितांना  मार्गदर्शन केले.तसेच सर्वसामान्य,शेतकरी,विधवा,अपंग यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन प्रहारचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे यांनी यावेळी दिले.

               याप्रसंगी प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष युनूस पठाण, माढा तालुकाध्यक्ष अमोल केसरे, विद्यार्थी संघटनेचे माढा तालुकाध्यक्ष प्रवीण लोकरे,तालुका संघटक विशाल कदम,माळशिरस तालुकाध्यक्ष संजय पोळ, शाखा अध्यक्ष अनिकेत साळुंखे, प्रयास फाउंडेशनचे अध्यक्ष विष्णू नलवडे,प्रहार समर्थक बप्पा गणगे, लक्ष्मण वाळूजकर, सौरभ लोकरे,अमित लेंडवे,ग्रा.प.सदस्य कल्याण गाडे,पवन भोंग,लिंबाजी कथले, पत्रकार प्रवीण लोकरे,महादेव लोकरे, दीपक लोकरे,संभाजी गणगे यांच्यासह पंचक्रोशीतील पशुपालक,ग्रामस्थ, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages