श्री संत कुर्मदास साखर कराखान्याचे अध्यक्षपदी अँड.धनाजीराव साठे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 7, 2022

श्री संत कुर्मदास साखर कराखान्याचे अध्यक्षपदी अँड.धनाजीराव साठे

श्री संत कुर्मदास साखर कराखान्याचे अध्यक्षपदी अँड.धनाजीराव साठे


तर उपाध्यक्षपदी सुधीर पाटील यांची बिनविरोध निवड

          माढा, (कटुसत्य वृत्त):- श्री. संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी  माजी आमदार अँड.श्री.धनाजीराव गणपतराव साठे तर उपाध्यक्षपदी श्री. सुधीर पांडूरंग पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे आज कारखाना कार्यस्थळावर झालेल्या संचालक मंडळ सभेत निवडणूक निर्णय अधिकारी मा.ज्योती कदम यांनी जाहीर केले.माढा तालुक्यातील  श्री संत कुर्मदास सहकारी कारखान्याच्या सन 2022 ते 2027 या पंचवार्षिक कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक कारखान्याचे संस्थापक विद्यमान चेअरमन आमदार अँड.श्री.धनाजीराव गणपतराव साठे यांच्या नेतृत्वाखाली एकुण 17 जागेपैकी सर्व 17 जागा बिनविरोध निवडून आल्या. कारखान्याच्या स्थापने पासून संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूका ह्या बिनविरोध झालेल्या आहेत. सदरची निवडणूक ही चौथ्यांदा बिनविरोध झालेली आहे. सहकारी साखर कारखान्याच्या क्षेत्रामध्ये बिनविरोध निवडणूका होण्याचा एक वेगळा आदर्श संस्थापक चेअरमन अँड.मा.श्री.धनाजीराव साठे यांनी सहकार क्षेत्रापुढे  घालून दिलेला आहे.  

          कारखान्याचे चेअरमन पदासाठी मा.श्री. धनाजीराव गणपतराव साठे यांचे नाव संचालक श्री. विठ्ठल रामलिंग शिंदे यांनी सूचविले त्यास संचालक श्री. हरिदास पांडूरंग खताळ यांनी अनुमोदन दिले. तर व्हाईस चेअरमन पदासाठी श्री. सुधीर पांडूरंग पाटील यांचे नाव संचालक श्री. गणपत धनाजीराव साठे यांनी सूचविले त्यास संचालक श्री. शशिकांत रामचंद्र देशमुख यांनी अनुमोदन दिले. चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यामुळे अध्यासी अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची  बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.   

          राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दि.31 मार्च 2021 पुर्वी मुदत संपलेल्या सहकारी संस्थाच्या निवडणूका घेण्याबाबत काढलेल्या आदेशाप्रमाणे श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूकीची प्रक्रिया जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर), सोलापूर विभाग सोलापूरचे श्री. राजेंद्र कुमार दराडे यांचेमार्फत राबविण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुर्डुवाडी मा.ज्योती कदम यांनी व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. राजेश चव्हाणसो तहसिलदार माढा, व सहा.निबंधक सहकारी संस्था चे श्री. सुधाकर लेंडवे सो तसेच नायब तहसिलदार श्री. आर.आर.कदमसो यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. 

          कारखान्याचे चेअरमन यांनी आपली स्वतची मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवून गेली  6-7 वर्ष सुरुळीतपणे चालू ठेवून एक नवीन आदर्श इतर कारखान्याच्या समोर ठेवलेला आहे.त्यामुळे कारखान्याचे सभासद, कर्मचारी, ऊसतोडणी  वाहतुक  कर्मचारी  यांचे बिले व पगार देवून विश्वासर्हता निर्माण केली आहे. त्यामुळे कारखान्यावर उत्साहाचे वातारण आहे. 

          सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक श्री.गणपत साठे, श्री. हरिदास खताळ, श्री.भालचंद्र पाटील, श्री.विजयसिंह पाटील, श्री. राहुल पाटील, श्री.मधुकर  चव्हाण, श्री.विठ्ठल शिंदे, श्री.शशिकांत देशमुख, श्री.बाळासाहेब पाटील, श्री.सयाजी पाटील, श्री. सिराज शेख, श्री.नारायण गायकवाड, श्री. शंकर नाईकवाडे, सौ. शालिनी कदम, सौ. संध्याराणी खरात, मार्गदर्शक श्री.बी.डी. पाटील, कार्यकारी संचालक श्री.राजेंद्र देशमुख, प्रोडक्शन मँनेजर श्री. बाळासाहेब पवार, सेक्रेटरी श्री.चंद्रहास गायकवाड, श्री.अक्रुर यादव, सचिन पाटील, बालाजी पाटील, सुर्यकांत महाडिक, महादेव मोरे, पद्माकर मोरे, सुर्यकांत महाडीक, सज्जन पाटील, शिवाजी भाकरे, आजिनाथ माळी, नितीन साठे, चंद्रकांत कांबळे, शिवाजी माने, धनजंय यादव, बाळासाहेब पाटील, बाबुराव सुर्वे, सौ.नंदाताई सुर्वे, आजिनाथ इंगळे, नवनाथ इंगळे (सर), मुकणे (सर), प्रमोद इंगळे, नगरसेवक नितीन साठे, अरुण कदम, सुधीर लंकेश्वर, बाबुराव लटके,वेदांत भैया साठे, सुभाष लोंढे, अरुण लटके, भाऊ वाघ, संतोष पाटील, गणेश बागल, विविध गावचे सरपंच, उपसरपंच,ग्रा.सदस्य, सोसायटी चेअरमन, सदस्य, कारखान्याचे कर्मचारी व सभासद वर्ग व साठे परिवारावर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages