मुख्याधिकारी केंद्रेंची तत्परता ; विद्यानगर कॉलनीतील संथ गतीने चालणाऱ्या कामाची घेतली दखल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 15, 2022

मुख्याधिकारी केंद्रेंची तत्परता ; विद्यानगर कॉलनीतील संथ गतीने चालणाऱ्या कामाची घेतली दखल

 मुख्याधिकारी केंद्रेंची तत्परता ; विद्यानगर कॉलनीतील संथ गतीने चालणाऱ्या कामाची घेतली दखल

           सांगोला (कटूसत्य वृत्त):- सांगोला नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी विद्यानगर कॉलनीतील संथ गतीने चालणाऱ्या गटाराच्या कामाची तातडीने दखल घेऊन संबधित ठेकेदारास गतीने आणि दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या. मुख्याधिकाऱ्याच्या या तत्परतेने विद्यानगर कॉलनीतील नागरिकांनी त्यांचे आभार मानत आहे.

           मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी नगरपालिकेचा कारभार हाती घेतल्यापासून सर्व शहरातील नागरिकाच्या प्राथमिक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गेल्या महिन्याभरापासून सदर काम संथ गतीने सुरू होते.या कामामुळे कॉलनीतील नागरीकांना ये जा करण्यासाठीं अडचण होत होती. विद्यानगर कॉलनीतील काही नागरिकांनी तातडीने फोन वरून मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना कल्पना देताच त्यांनी सदर कामास भेट देवून ठेकेदारास गतीने काम करण्याच्या सूचना दिल्या.

           विद्यानगर कॉलनीत असलेल्या सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयास त्यांनी भेट देवून "हर घर तिरंगा"या शासनाच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.या वेळी प्राथमिक विद्यालयाचे प्र मुख्याध्यापक उदय बोत्रे, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रोहिणी व्हटे यांनी त्यांचा सत्कार केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages