कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांच्या जयंतीनिमित्त विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून अभिवादन

विरोधी पक्षनेते तथा राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून कबड्डी दिनाच्या शुभेच्छा
मुंबई, (नासिकेत पानसरे):- कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांच्या जयंतीनिमित्त विरोधी पक्षनेते तथा महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी क्रीडाक्षेत्रातील त्यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना भावपूर्ण अभिवादन केले आहे. क्रीडामहर्षींच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या कबड्डी दिनाच्या राज्यातील जनतेला त्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.
महाराष्ट्राच्या मातीतील कबड्डी सारख्या रांगड्या खेळाला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा, प्रसिद्धी मिळवून देण्याचे काम स्वर्गीय बुवा साळवी यांनी केले. कबड्डी खेळाला राजाश्रयाबरोबरच लोकाश्रय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट घेतले. कबड्डी खेळाच्या प्रसार-प्रचारासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूयात, हीच क्रीडामहर्षींना खरी आदरांजली ठरेल, अशा भावना व्यक्त करुन राज्यातील कबड्डी खेळाडू, प्रशिक्षक, कार्यकर्ते, हितचिंतकांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कबड्डी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment