सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

विद्यार्थ्यांनी गुरूंना अग्रस्थानी ठेवून आपले कार्य व शिक्षण सुरू ठेवावे :- उदय बोत्रे
सांगोला (कटुसत्य वृत्त): सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयात व्यास गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.सुरुवातीस संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास व व्यास मुनींच्या प्रतिमेस प्र.मुख्याध्यापक उदय बोत्रे यांनी अभिवादन करुन पुष्पहार अर्पण केला. यानंतर उदय बोत्रे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्व पटवून देवून विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुरुस्थानी मानून व्यक्तिमत्व विकास घडवून आणावा. स्पर्धेच्या युगात कोणत्याही गुरूला केंद्रस्थानी किंवा त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तरच यश मिळेल, असा संदेश विद्यार्थ्याना दिला.
यावेळी विद्यालयातील सहशिक्षिका सोनाली खडतरे यांनी गुरु पौर्णिमेची महती विद्यार्थ्यांना सांगितली. त्याचबरोबर गुरुजणांचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे सांगून गुरुपौर्णिमेचे महत्व अधोरेखित केले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना गुलाब पुष्प देऊन गुरुपौर्णिमेनिमित्त सन्मानित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश दिघे यांनी केले तर आभार इकबाल शेख यांनी मानले. सदर कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment