गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कार्यक्रम पार पडला
कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा कार्यक्रम नवोदय सहकारी पतसंस्था म. तडवळे यांच्या वतीने करण्यात आला. गुरु पौर्णिमेच्या उचित्य साधून तडवळे येथील नवोदय परीक्षेत व शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे नवोदय सहकारी पत संस्था म. चे संस्थापक श्री प्रदीप विश्वासराव पाटील यांच्या वतीने नवोदय, शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेतील 2020,2021,2022 मधील थोड्या गावातील तब्बल 85 विद्यार्थ्यांना श्री रामदास तुकाराम कोकरे (सह. आयुक्त. न. पा. शाखा जिल्हाधिकारी कार्यालय लातूर) यांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री प्रदीप पाटील, प्रमुख पाहुणे श्री रामदास कोकरे, अजित खंदारे, डॉ. बाळासाहेब लोंढे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री सुनील वळेकर, जि प केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री केशव पवार, जि प कन्या शाळेचे मुख्याध्यापक श्री रेहमान सय्यद, तसेच जयहिंद विद्यालयाचे प्राचार्य श्री सुहास पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अनिल शिरसागर यांनी केले तर कार्यक्रमात श्री जगन्नाथ धायगुडे, श्री अजित खंदारे, श्री रामदास कोकरे,श्री प्रदीप पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बाळासाहेब जमाले यांनी *काय शाळा, काय निकाल,काय विद्यार्थी सगळं काही ओके आहे*या गोड शब्द सूत्रसंचालन केले.
No comments:
Post a Comment