परीक्षित कांबळे याची नवोदय विद्यालय साठी निवड

कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- उस्मानाबाद जिल्ह्यातील मंगरूळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवी वर्गातील कुमार परीक्षेत पवन कांबळे यांची निवड नवोदय स्पर्धा परीक्षेत करण्यात आली आहे. त्याला पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग शिक्षिका श्रीमती नंदा घुटे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच मुख्याध्यापक श्री गोपीनाथ मुंडे शिक्षक श्री सुबराव काळे श्री सतीश गायकवाड व सर्व शिक्षक वृंद यांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभले शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्ष्या सौ मंगलाताई भराडे सर्व सदस्य व शिक्षक प्रेमी नागरीक यांनी त्याचे अभिनंदन केले तसेच त्याच्या या यशाबद्दल गावातून सर्वत्र कौतुक केले जात आहे.
No comments:
Post a Comment