ब्रम्हा नंदी टाळी लागली - विजय दीक्षित


संगमनेर - गुरुपोर्णिमाचे औचित्य साधून स्वयंप्रेरित संस्था संगमनेर यांनी भक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता. याच परिसरात असणाऱ्या साई मंदिरात भक्तांनी गर्दी केली होती. संगमनेर साहित्य परिषदेचे गायक, गायिका यांनी यांनी सुंदर भक्तिगीते सादर केली. 'पंचपदी'- संजय सोनुसे, 'फिरत्या चाकावरती ' , 'कानडा राजा पंढरीचा' दीपक टाक , 'कुठे शोधीशी रामेश्वर' , 'दत्त दिगंबर दैवत माझे' आणि 'देह देवाचे मंदिर'- बाळकृष्ण महाजन , 'हरी सुंदर नंद मुकुंदा' आणि ' विठूचा गजर हरिनामाचा झेंडा '- सुरेश परदेशी , ' मन लागो रे लागो' आणि 'ज्ञानियाचा राजा'-- विजय दीक्षित, "खेळ मांडियला' आणि 'कोटी कोटी रूप तुझी" - आरसिद्ध सुविधा यांनी सादर केलेल्या रचनांना श्रोत्यांनी दाद दिली. यावेळी हार्मोनियमची साथ संजय सोनुसे आणि तबल्याची साथ दर्शन जोशी दिली. ब्रम्हा नंदी टाळी लागल्याचा अनुभव या मैफिलीत अनुभवला असे उदगार विजय दीक्षित यांनी काढले . या प्रसंगी या संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर यांचेकडे परिषदेसाठी स्वयंप्रेरित संस्थेचे संतोष पवार देणगी दिली आणि उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला.
No comments:
Post a Comment