शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲप द्वारे पिकांची नोंद करण्याचे आवाहन

सोलापूर, (कटुसत्य वृत्त):- राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी शासन निर्देशानुसार शेतातील पिकांची नोंद ई पीक पाहणी ॲप द्वारे करावयाची आहे. या ॲपद्वारे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची नोंद स्वतः शेतात जाऊन करावयाची आहे. पिकाची नोंद न केल्यास शेतकऱ्यांच्या सातबारा मधील पीक पेरा कोरा राहील. यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही शासकीय मदत, पिक विमा, पीक कर्ज, अनुदान प्राप्त होणार नाही. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक पाहणी अँप द्वारे स्वतःच्या शेतातील पिकांची नोंद करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी केले.
No comments:
Post a Comment