हत्ताजोडी आणि इतर वन्यप्राणी अवयव विकताना ८ जणांना अटक

वनपरिक्षेत्र पंढरपूर कार्यालयाची धडक कारवाई
सोलापूर (कटुसत्य वृत्त): वन विभागाला दिनांक 11 जुलै 2022 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून वनपरिक्षेत्र पंढरपूर अंतर्गत मौ.पंढरपूर येथे आषाढी वारी निमीत्त भरलेल्या यात्रे मध्ये कांही लोक तुळशी, रुद्राक्ष माळा यांचेसह वन्यप्राण्यांचे (अवयव) हात्ताजोडे, वन्यप्राण्यांची नखे व इतर साहित्य विकत असल्या बाबतचे माहिती मिळाली.
त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती चैत्राली सुरेश वाघ यांनी त्यांचे अधिनस्थ कर्मचारी यांचेसह सरगम चौक जवळील सर्कसच्या मैदानाला लागून असलेल्या ठिकाणी धाड घातली असता त्याठिकाणी १) मिल्टर मलमलशा भोसले यांचेकडून हात्ताजोडी - ७ वन्यप्राण्यांच्या नख्या - २३, कस्तुरी मृग सदृष्य गोळे- २८ इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले.
त्यानंतर भोसले यांच्या कडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने शिवाजी महाराज पुतळा चौक या ठिकाणी जावून धाड घातली असता २) जडबूख मवडर पवार यांचे स्टॉलवरुन हात्ताजोडी - २२ वन्यप्राण्यांच्या नख्या २, कस्तुरी मृग सदृष्य गोळे-३०, अस्वलाचे केस- अंदाजे २५० मिली ग्रॉम इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले.
त्या ठिकाणाला लागून असलेल्या ३) बगलेबाई अंकुश पवार यांचे स्टॉलवरुन हात्ताजोडी -८ कस्तुरी मृग सदृष्य गोळे-५०, इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर तेथील दुसऱ्या दुकानाची झडती घेतली असता ४) छायाबाई अंकूश पवार यांचे स्टॉलवरुन वन्यप्राण्यांची छोटी नखे -१४, कस्तुरी मृग सदृष्य गोळे-२२. इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर पुढील दुकानाची झडती घेतली असता ५) पूजा सुरेश पवार यांचे स्टॉलवरुन हात्ताजोडी -०३ वन्यप्राण्यांची नखे -१३, कस्तुरी मृग सदृष्य गोळे-४३. इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर चंद्रभागा वाळवंट परिसर मध्ये गेलो असता ६) बादल श्याम पवार यांचे स्टॉलवरुन छोटया आकाराची वन्यप्राण्यांच्या नख्या ५६. वाघ सदृष्य वन्यप्राण्यांची नखे-२०, हरीण वर्गीय प्राण्याचे कातडे -१ (१०x९ से.मी) कस्तुरी मृग सदृष्य गोळे- २१ इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले.
त्यानंतर बादल श्याम पवार यांचे उजव्या हाताला तिसऱ्या दुकानावर धाड टाकली असता ७) सुहाना नाफरिया पवार यांचे स्टॉलवरुन वनसदृष्य प्राण्यांची नखे १०, कस्तुरी मृग सदृष्य गोळे-३१. छोटया आकाराची वन्यप्राण्यांच्या नख्या -३० इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतर बादल श्याम पवार यांचे डाव्या हाताच्या पाचव्या दुकानावर धाड टाकली असता. ८) मालाश्री नवनाथ पवार यांचे स्टॉलवरुन हात्ताजोडी -५. वाघ सदृष्य वन्यप्राण्यांचे अवयव २८, कस्तुरी मृग सदृष्य गोळे-१७ इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले.
या ठिकाणी जप्त करण्यात आलले साहित्य आणी त्याठिकाणी मिळून आलेले परिस्थितीजन्य पुराव्या वरुन उपरोक्त नमूद आरोपी १) मिल्टर मलमलशा भोसले २) जडबूख मवडर पवार ३) बगलेबाई अंकूश पवार ४) छायाबाई अंकूश पवार ५) पूजा सुरेश पवार ६) बादल श्याम पवार ७) सुहाना नाफरिया पवार ८) मालाश्री नवनाथ पवार यांचे विरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २ (१६). २(३६), ९, ३९R/W५७, ४४, ४८. ५० व ५१ अन्वये प्राथमिक गुन्हा क्रमांक WL-१२/२०२२ दि. ११/०७/२०२२ रोजी दाखल करण्यात आला.
या प्रकरणामध्ये जप्त करण्यात आलेले हात्ताजोडे हे घोरपड (Monitor Lizard) या वन्यप्राण्यांची जनन इंद्रिय असे करीता हा गुन्हा हा घोरपड या शेडयूल 1 प्राण्यांच्या अनुषंगाने घडलेला आहे. त्याच बरोबर ह्या गुन्हात जप्त करण्यात आलेले वन्यप्राण्यांचे कातडे, नखे, कस्तूरी मृग सदृष्य गोळे, आस्वलाचे केस हे सर्व बाबी शेडयूल-1 या प्राण्यांच्या संदर्भात असल्याने सदर गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरुपाचा आहे.
ही कारवाई श्री.डी.एम.पाटील उपवनसंरक्षक सोलापूर, बी.जी. हाके सहा. वनसंरक्षक (कॅम्पा) सोलापूर, श्री.एस.एल. आवारे सहा, वनसंरक्षक (रो.ह.यो) सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती सी.एस.वाघ वनपरिक्षेत्र अधिकारी पंढरपूर, श्री. एस. डी. बुरूंगले वनपाल मंगळवेढा, श्रीमती.एस.एस. पत्की वनपाल पंढरपूर श्री टी.एस. दिधे वनरक्षक करकंब, श्री.एस.डी. कांबळे वनरक्षक पंढरपूर व श्री.बी.एम. पिसे कायम वनकर्मचारी यांचे पथकाने पुर्ण केली. ह्या प्रकरणाचा पुढील तपास श्री.बी.जी. हाके सहा. वनसंरक्षक (कॅम्पा) सोलापूर हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment