जिल्ह्यातील एसटी बसवर असणार 'हर घर झेंडा' संदेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 15, 2022

जिल्ह्यातील एसटी बसवर असणार 'हर घर झेंडा' संदेश

जिल्ह्यातील एसटी बसवर असणार 'हर घर झेंडा' संदेश

              सोलापूर, (कटुसत्य वृत्त): शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ११ ऑगस्ट ते१७ ऑगस्ट  २०२२ या कालावधीमध्ये 'हर घर झेंडा' उपक्रम राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील एसटी बसवरही संदेश देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

              जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर, सर्व शासकीय/निमशासकीय / खाजगी आस्थापना/सहकारी संस्था/शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी करण्यात येणार आहे. याची जिल्हा प्रशासन जोरदार तयारी करीत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील राज्य परिवहनच्या सर्व बस "हर घर झंडा" याच्या संदेशाने रंगविल्या जाणार आहेत.

              पथकर व तपासणी नाके, प्रसार, ध्वनी व चित्रमुद्रण प्रणालीच्या माध्यमातून हर घर झंडा या कार्यक्रमाचा प्रचार, प्रसार व जागरुकता निर्माण करण्यात येणार आहे. ध्वनीचित्रमुद्रण (व्हिडीओ) प्रणालीद्वारे जिल्हांतर्गत प्रवासी बसेसमध्ये सांगितिक जाहिराती (जिंगल्स), ध्वनीमुद्रित ध्वजगीत वाजविणे, ध्वज संबंधित चित्रफित दाखविणे इ.कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages