बार्शी काँग्रेस मुळे बार्शीच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ..! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 28, 2022

बार्शी काँग्रेस मुळे बार्शीच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ..!

 बार्शी काँग्रेस मुळे बार्शीच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ..!


बार्शी (कटूसत्य वृत्त):- बार्शी काँग्रेसच्या शहर अध्यक्ष पदी रिक्त जागेवर नियमित अध्यक्ष नेमणूक होईपर्यंत तात्पुरता पदभार डॉक्टर साळुंके यांस दिला आहे. मात्र ही बातमी पूर्ण वेळ नियमित अध्यक्ष नेमल्याच्या अविर्भावात चुकीची पसरविताना दिसत आहे. 
या बातमी नंतर बार्शीतील डॉक्टर वर्ग हा साळुंके डॉक्टर नेमका कुठला आणि कशाचा डॉक्टर आहे असा प्रश्न बार्शीकरांकडून विचारला जात आहे. त्यामुळे काहीजण ते कानाचा, नाकाचा, हाडाचा की बालरोग तज्ञ आहे ?  याचा शोध घेत आहेत. माध्यमांनी शहानिशा करूनच बातमी तयार करावी असा विनंतीवजा सल्लाही अनेकांनी दिला आहे. चुकीची माहिती पसरवू विपरीत काही घडू नये. साळुंके नेमके कशाचे डॉक्टर आहेत हे पाहावे आणि नियुक्ती पत्रामध्ये नेमके काय लिहिले आहे, तेही पाहावे.  सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर अध्यक्ष पदाच्या तातुरत्या नेमणुकीस जिल्हा अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी पत्र का दिले नाही. जिल्हा अध्यक्ष यावेळी फोटोत का दिसत नाहीत. देशाचे माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची अनुकूलता आहे का? या नेमणुकीस असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत...? विशेष म्हणजे.  बार्शीकर जनता आजही तडफदार युवा नेते ॲड. जीवनदत्त आरगडे यांच्या भूमिकेची वाट पहात आहेत. तात्पुरत्या  नेमणुकीच्या फोटोत जे जे आहेत त्यांना  ॲड. आरगडे यांनीच उभारी आणि प्रतिष्ठा दिलेली आहे. तात्पुरते नेमलेले अध्यक्ष हे नावासमोर डॉक्टर लावतात त्यांनी त्यांचे ते नेमके कशाचे डॉक्टर आहेत. त्याचे किंवा डॉक्टरेट पदवीचे तरी प्रमाणपत्र सार्वत्रिक करावे. अन्यथा लोक दवाखाना शोधत बसतील असा खोचक प्रश्नही विचारला जातआहे.
बार्शी काँग्रेस ही संकल्पना ॲड. जीवनदत्त आरगडे यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आतातरी ॲड. जीवनदत्त आरगडे यांनी मौन सोडावे. आणि भूमिका स्पष्ट करावी.अशी मागणी काँग्रेस विचारांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. तसेच रेशनचा एक, एक किलो जास्त गहू देतो, म्हणून काँग्रेस पक्षाची बोगस सभासद नोंदणी करून वरिष्ठांच्या नजरेत धूळफेक करून खोटी वस्तुस्थिती निर्माण केली. काँग्रेस सभासदाची बोगस सभासद नोंदणी केलेला साळुंके डॉक्टर सुद्धा बोगसच की खरा असा प्रश्न पडला आहे..? काँग्रेस पक्षात अखिल भारतीय काँग्रेस, प्रदेश काँग्रेस, जिल्हा काँग्रेस आणि ब्लॉक काँग्रेस अशी संघटनात्मक रचना आहे. त्यामुळे जिल्हा काँग्रेस शिवाय थेट एखादा ब्लॉक अध्यक्षाची केलेली नेमणूक ही नियमबाह्य आणि अवैध आहे. जरी ती प्रभारी असेल तरी पक्ष घटनेच्या नियमात ही नियुक्ती अवैध आहे. असेही काँग्रेस पक्षा अंतर्गत कुजबुज सुरू आहे. कसलीही शहानिशा न करता अशा नेमणुका करणे हे पक्ष वाढीस घटक असून गटबाजी आणि अंतर्गत खदखद जन्माला घालणारी आहे. त्यामुळे सद्य स्थितीत पहिले एक पद असलेल्या व्यक्तीला पुन्हा आणखी दुसऱ्या पदावर नेमणूक करणे आणि जुन्या निष्ठावंत असलेल्या ॲड. आरगडे याना तसेच अनिर्णीत ठेवणे यातच आरगडे जिल्हा काँग्रेस अंतर्गत होत असलेल्या गटबाजीचे शिकार झाले आहेत की काय अशी शंका उपस्थित होते. काही डाक बंगला, विमानतळ, आणि स्टेजवर दिसणारे कार्यकर्ते हे चापलुशी आणि दिखाऊपणा करून आपण फार मोठे नेते आहोत आसा आव आणून  समर्पित काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अडचणी आणतात हे बार्शी काँग्रेस बाबतीत दिसून येत आहे. त्यामुळे दोन चार हल्ले आणि राजकीय वादातून आरोप झालेले आरगडे यांच्या सारख्या लढावू कार्यकर्त्यांना बाक्या प्रसंगी एकाकी पाडणे यामुळे बोटचेपे आणि भिडस्त कार्यकर्ते राहतील आणि आक्रमक धडाडीचे तरुण काँग्रेस पक्षाकडे पाठ फिरवतील हे मात्र नक्की. बार्शी हा काँग्रेस विचारांचा मतदार संघ आहे आणि प्रतिकूल परिस्थितीत ॲड. आरगडे यांनी पक्षासाठी दिलेले योगदान आणि केलेले कार्य हे पक्षाने डोळ्यावर कातडी ओढून दुर्लक्षित करण्या इतकी काँग्रेस संघटना जिल्ह्यात ओसंडून वाहत नाही मात्र काँग्रेस वाढी पेक्षा गटबाजी सुरू असल्याने असे चित्र दिसत आहे. यामध्ये बार्शी कडे जिल्हा नेतृत्व फार गांभीर्याने विचार करताना दिसून येत नाही असे दिसते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages