नवीन सरकार स्थापन करुन महिना होत आला तरी मंत्रीमंडळ नाही ही राज्याच्यादृष्टीने शोकांतिका - महेश तपासे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 27, 2022

नवीन सरकार स्थापन करुन महिना होत आला तरी मंत्रीमंडळ नाही ही राज्याच्यादृष्टीने शोकांतिका - महेश तपासे

 नवीन सरकार स्थापन करुन महिना होत आला तरी मंत्रीमंडळ नाही ही राज्याच्यादृष्टीने शोकांतिका - महेश तपासे

मुंबई (नासिकेत पानसरे):- एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना शपथ घेऊन महिना होत आला तरी मंत्रीमंडळ स्थापन करु शकत नाही ही राज्याच्यादृष्टीने फार मोठी शोकांतिका आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी शिंदेसरकारवर तोफ डागली आहे.

सरकार स्थापन झाल्यानंतर ९० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर साडेआठ लाख हेक्टरवरील शेतीचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय या सरकारने अद्याप घेतलेला नाही. 

मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या नावाखाली त्यांना सारखंसारखं दिल्लीला जावं लागत आहे. दिल्लीश्वरांची मर्जी राखावी लागत आहे. तरीदेखील दिल्लीतून मंत्रीमंडळ विस्ताराचा हिरवा कंदील मिळत नाहीय किती दिवस दिल्लीत जाऊन स्वतः चा अपमान करुन घेत आहात असा रोखठोक सवालही महेश तपासे यांनी केला आहे. 

शिवसेनेत एवढं मोठं बंड करून नवीन सरकार स्थापन केले मात्र आतापर्यंत फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या व्यतिरिक्त मंत्रीमंडळाचा विस्तार करु शकत नाही हे दुर्दैवी आहे असेही महेश तपासे म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages