सोशलमीडीयावर अक्षेपार्ह फोटो वायरल केल्या प्रकरणी... साजिद सय्यद व सोमनाथ हुलगेवर अकलूज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
अकलूज (कटूसत्य वृत्त):- सोशल मीडिया वरील what's app आणि Facebook या माध्यमांवर साजिद सय्यद या व्यक्तीने स्वतःच्या what app स्टेट्स वर भारतीय जनता पक्षाचे नेते जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशिल मोहिते-पाटील यांचा जेल मध्ये असलेला प्रतिकात्मक फोटो edit करून what's app स्टेट्सला ठेवला तसेच तोच फोट सोमनाथ हुलगे नामक व्यक्तीने फेसबूक स्टेट्स ठेवून विविध समाजमाध्यमावार वायरल करून हेतुपुरस्सर बदनामी करणाऱ्या साजिद सय्यद व सोमनाथ हुलगे यांच्या विरोधात भारतीय दंड संहीता १८६० च्या कलम ५०१( ब) नुसार अकलूज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
सोमनाथ हुलगे याने विजय पतसंस्थेचे कर्ज घेऊन ते बुडवण्याच्या हेतुने धैर्यशिल मोहिते-पाटील यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला ही बाब न्याय प्रविष्ठ आहे व मे.जिल्हा न्यायालय माळशिरसकडे पुढील अपिलाचे कामकाज चालू असताना असे धैर्यशील मोहिते-पाटील यांचा जेल मध्ये असलेला बनावट अक्षेपार्ह फोटो तयार करून मोहिते-पाटील यांची जाणून बुजून वरील बदनामी केल्याची तक्रार भाजपचे सोशलमिडीया तालुका अध्यक्ष अजित शिंदे यांनी केली असून सदर तक्रारीचा तपास API चौधरी यांच्याकडे आहे.
अक्षेपार्ह फोटो फेसबूक स्टोरी what's app स्टेट्स व विविध ग्रुपवर पाठवणाऱ्या व्यक्तीवर सायबर अॅक्टच्या माध्यमातून गुन्हा दाखल व्हावा व वरील कृत्य करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी व निवेदन दिले.
.jpeg)
No comments:
Post a Comment