श्रद्धा शैक्षणिक समूहाच्या पायी दिंडीने वेधून घेतले सर्वांचे लक्ष

मोहोळ नगर परिषदेसमोर रिंगण सोहळा
मोहोळ (कटुसत्य वृत्त) : दरवर्षीप्रमाणे यंदाही मोहोळ येथील श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढी वारी पायी दिंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.शुक्रवारी सकाळी ११ वाजता श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूल व श्रद्धा विद्या मंदिर मोहोळ येथे चिमुकल्यांचा आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पायी दिंडीचे प्रस्थान
श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूल इथून पंढरपूर रोड मार्गे शिवाजी चौकात आणि शिवाजी चौकातून नगरपरिषदेच्या इमारती समोरील प्रांगणापर्यंत झाले.या पालखी सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषांचे सादरीकरण केले. यामध्ये विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मीराबाई, संत गाडगे महाराज अशा अनेक वेशभूषा मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांमुळे पालखीचे वातावरण भक्तीमय व संतमय झाले. यावेळी सामाजिक संदेश विविध फलकांच्या माध्यमातून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दिले.
पालखी सोहळा मार्गावर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कलागुणांचे सादरीकरण केले. या पालखी सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून युवा सेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख व संस्थेचे सचिव सुनील झाडे, मोहित झाडे, मिलन ढेपे इ उपस्थित होते. या पालखी मार्गावर संभाजी राजे चौक येथे सुजित काळे व मित्रपरिवार, विक्रम देशमुख तसेच नगरपरिषद परिसरात पत्रकार संघाच्या वतीने तर पंचायत समितीचे विषय तज्ञ राजेंद्र बाबर, सोमेश आबा क्षीरसागर, संजय काका देशमुख यांनी पालखीचे सोहळ्याचे स्वागत केले. हा दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका वीणा कदम, फुलचंद साळुंखे, दिनेश नरळे, अमोल गावडे, विद्या पवार, तृप्ती कदम,अजितकुमार जाधव, पल्लवी गोडसे इतर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment