बेंबळे येथे हरित वारी संकल्पनेतून वारकरी महिलांच्या हस्ते वृक्षारोपण... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 9, 2022

बेंबळे येथे हरित वारी संकल्पनेतून वारकरी महिलांच्या हस्ते वृक्षारोपण...

बेंबळे येथे हरित वारी संकल्पनेतून वारकरी महिलांच्या हस्ते वृक्षारोपण...

               बेंबळे (कटुसत्य वृत्त): बेंबळे मार्गे  विविध ठिकाणाहून येणाऱ्या पायी दिंड्या या पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत त्यातीलच श्री क्षेत्र वळण येथील वै. गंगागिरी महाराज पायी दिंडी सोहळ्यामधील महिला वारकऱ्यांच्या हस्ते बेंबळे येथील ज्योतिबा मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बेंबळे गावातील महिला स्वयंसहाय्यता समूहातील महिला व बेंबळे ग्रामपंचायत यांच्या वतीने वारकऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी बेंबळे गावचे सरपंच विजय पवार उपसरपंच सौ नामिता अनपट ग्रामपंचायत सदस्य सौ संजीवनी भोसले, शैलजा किर्ते,दादा भगत  राहुल कुलकर्णी, हनुमंत अनपट,गोरक अनपट,राजेद्र जगताप,बबलु काळे,दिपक किर्ते ग्रामसेवक मधुकर माने माजी सरपंच कैलास दादा भोसले आदी सह हनुमंत लोंढे, नामदेव भोजणे बिभीषण भोसले सह अनेक जण उपस्थित होते. ज्योतिबा मंदिर येथील पुजारी सुनील देवगुणे हे मंदिर परिसरातील वृक्षांची देखभाल करणार आहेत.

               यावेळीराष्ट्रमाता जिजाऊ समूहाच्या सचिव अनुराधा शिंदे , सदस्या अलका हुलगे, हिरकणी समूहाच्या अध्यक्ष सोनाली अवताडे, सचिव कोमल गोडसे ,सदस्य गीता अवताडे, योगिता अवताडे, कविता गोडसे ,विद्या जगताप, सविता अवताडे, जयश्री आवताडे ,तसेच संघर्ष महिला समूहाच्या रमा ताकतोडे, रूपाली किर्ते, रोहिणी सोनवणे, व भिमाई समूहाच्या  नाजुका ताकतोडे, तसेच सीआरपी शैलजा कीर्ते ,भाग्यश्री हुलगे, महिला उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages