आमदार भरतशेठ गोगावलेंच्या प्रयत्नांमुळे रायगड जिल्ह्यातील पथदिवे पुन्हा प्रकाशमय होणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 9, 2022

आमदार भरतशेठ गोगावलेंच्या प्रयत्नांमुळे रायगड जिल्ह्यातील पथदिवे पुन्हा प्रकाशमय होणार

आमदार भरतशेठ गोगावलेंच्या प्रयत्नांमुळे रायगड जिल्ह्यातील पथदिवे पुन्हा प्रकाशमय होणार

               बोरघर / माणगाव (कटुसत्य वृत्त): मागील अनेक महिन्यां पासून संपूर्ण रायगड जिल्ह्यातील स्ट्रीट लाईट तथा पथदिवे थकीत वीज बिलाच्या कारणांमुळे पुर्णपणे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील जनता रात्री अपरात्री ऐन पावसाळ्यात अनेक संकटांचा सामना करत भयाण अंधारात चाचपडत आहे. सदर गंभीर बाब लक्षात घेऊन तमाम रायगड करांची समस्या व कैफियत  माणगाव महाड चे कार्य सम्राट आमदार भरतशेठ गोगावलेंनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी यांच्या समवेत तातडीची मिटिंग घेऊन चर्चात्मक स्वरूपात अधोरेखित केली.     

               आमदार गोगावलेंच्या सुचनेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आमदार भरत शेठ गोगावले यांच्या  समवेत बैठक झाल्यानंतर गोगावले यांच्या मागणीला मान्यता दिली आहे.   

               रायगड जिल्ह्यातील स्ट्रीट लाईट तथा पथदिवे पूर्ववत चालू करण्यासंदर्भात सदरची मिटिंग शुक्रवार दिनांक ८ जुलै रोजी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या जिल्हा परिषदेतील दालनात माननीय कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगावले यांनी घेतली. 

               सदर मिटिंग दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आमदार गोगावले यांनी गेल्या वर्षी च्या पावसाळ्यातील दुर्घटनां बद्दलची आठवण करून देत या वर्षी देखील पावसाचे प्रमाण हवामान खात्याच्या अंदाजानुसार भरपूर असल्या कारणाने सदर स्ट्रीट लाईटची तथा पथदिवे पूर्ववत करण्याची अत्यंत आवश्यकता आहे, असे गोगावले यांनी सांगितले. गोगावले यांच्या मागणीची दखल घेत रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील बंद ठेवण्यात आलेल्या स्ट्रीट लाईट तथा पथदिवे  पूर्ववत सुरू करण्याचा आदेश संबंधित इलेक्ट्रिक विभागाचे अधीक्षक अभियंता मुलानी यांना सुचित केले. 

               यावेळी कार्यकारी जिल्हाधिकारी यांनी मुलानी साहेब यांना आपली जी थकीत रक्कम आहे ती आम्ही दोन दिवसात अदा करत आहोत तत्पूर्वी तात्काळ बंद केलेली  लाईट सुरू करण्याचे आदेश देण्यात यावेत असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले

               आमदार गोगावले यांच्या या प्रयत्नामुळे एेन पावसाळ्यात रायगड मधील जनता आमदार गोगावले यांनी केलेल्या प्रयत्नामुळे पुर्ववत होणाऱ्या स्ट्रीट लाईट तथा पथदिव्यांच्या प्रकाशामुळे प्रकाशमय होणार आहे. 

               यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीज कर माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश ताठरे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages