लोकतांत्रिक सेनानी संघाने मानले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार

- मिसाबंदी दिलासा देणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारची कृती अभिनंदनीय
- राज्यातील नव्या सरकारने घेतली मिसाबंदिंची दखल
- आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नाला यश
मुंबई, (नासिकेत पानसरे): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारने राज्यातील सर्व मिसाबंदिंचा सन्मान निधी म्हणजे पेन्शन पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयाचे लोकतांत्रिक सेनानी संघाने स्वागत केले आहे. मिसाबंदिंची राज्यव्यापी संघटना असलेल्या लोकतांत्रिक सेनानी संघाचे प्रवक्ते अनिल भदे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत. नव्या राज्य सरकारचा निर्णय अभिनंदनीय असून, लोकशाहीची बूज राखणारा आहे. पेन्शनसाठी नव्हेतर, लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्व सामान्यांची दखल घेऊन सरकारने त्यांचा गौरव केला आहे,असे अनिल भदे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हा निर्णय त्यावेळी घेऊन त्याची अंमलबजावणी केली होती. पण, मविआ सरकारने सदर निर्णय रद्द करून पेन्शन देणे बंद केले होते. विद्यमान राज्य सरकारने तत्परतेने पुन्हा निर्णय घेऊन आणीबाणी विरोधी लढ्याचे महत्व अधोरेखित केले आहे असेही अनिल भदे म्हणाले.
या महत्वपूर्ण विषयाचा पाठपुरावा कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार, भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी नव्या सरकारकडे तात्काळ केला होता. आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नाला यश आल्याचे अनिल भदे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment