रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक उद्या दि. 15 जुलै रोजी मुंबईत होणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 14, 2022

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक उद्या दि. 15 जुलै रोजी मुंबईत होणार

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक उद्या दि. 15 जुलै रोजी मुंबईत होणार

देशभरातील रिपाइं चे प्रतिनिधी  राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीस उपस्थित राहणार - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

                  मुंबई (नासिकेत पानसरे):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी ची बैठक येत्या दि.15 जुलै रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सभागृहात आयोजित करण्यात आली असून या बैठकीस देशभरातून रिपाइं चे सर्व राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.या महत्वपूर्ण  बैठकीत येत्या दि.15 जुलै रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले) पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणुक होणार आहे अशी माहिती रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.

                  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निवडणूक दि.15 जुलै रोजी दुपारी 3 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे निवडणूक निर्णय अधिकारी ऍड.बी के बर्वे यांच्या निरीक्षणाखाली करण्यात येणार असल्याची  माहिती ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages