जागतिक न्यायदिनानिमित्त कायदेविषयक शिबीर संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 19, 2022

जागतिक न्यायदिनानिमित्त कायदेविषयक शिबीर संपन्न

जागतिक न्यायदिनानिमित्त कायदेविषयक शिबीर संपन्न

               सोलापूर, (कटूसत्य वृत्त):-जागतिक न्याय दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वालचंद कॉलेज ऑफ आर्टस अॅण्ड सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.18) कायदेविषयक शिबीर आयोजित केले होते.

               महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सूचनेनुसार प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष शब्बीर अहमद औटी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर पार पडले.

               यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव नरेंद्र जोशी, वालचंद कॉलेज ऑफ आर्टस अॅण्ड सायन्सचे प्राचार्य संतोष कोटी यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य अनुप म्हेत्रे होते. कार्यक्रमामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या पॅनल विधिज्ञ अॅड. देवयानी किणगी यांनी उपस्थितीत विद्यार्थ्यांशी बालकांचे मुलभूत अधिकार व शिक्षणाचे अधिकार, सायबर क्राईम व जिल्हा विधीसेवा प्राधिकरण या विषयावर संवाद साधला.

               पॅनल विधिज्ञ बी.आर. पवार यांनी महिलाविषयक कायद्याची माहिती दिली. ॲड. व्ही. व्ही. कुर्ले यांनी सामाजिक न्याय दिवस याबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन प्राध्यापक श्री. तुपकर यांनी केले तर प्रा.डॉ. श्री.कस्तुरे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages