रोटरी क्लब अकलूजच्या वतीने वारकऱ्यांची सेवाभावी उपक्रमातून सेवा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 6, 2022

रोटरी क्लब अकलूजच्या वतीने वारकऱ्यांची सेवाभावी उपक्रमातून सेवा

रोटरी क्लब अकलूजच्या वतीने वारकऱ्यांची सेवाभावी उपक्रमातून सेवा

              अकलूज (कटूसत्य वृत्त):- दिनांक 5 जुलै रोजी अकलूज नगरीमध्ये जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन झाले. यावेळेस या पालखीसोबत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी सेवाभावी वृत्तीने सोनाज पेट्रोल पंप आवार, इंदापूर रोड, अकलूज या ठिकाणी रोटरी क्लब अकलूज आणि जैन सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने जवळपास 900 अशा विविध व्याधींनी त्रस्त असणाऱ्या व्यक्तींवर रोटरी क्लब अकलूज चे डॉ. बाहुबली दोशी, डॉ. अभिजीत गांधी, डॉ. अमोल फडे यांचे द्वारे मोफत औषधोपचार करण्यात आले.

              यावेळेस दोन हजार वारकऱ्यांना बिस्किट पुड्यांचे मोफत वाटप करण्यात आले. वारकऱ्यांसाठीचे हे सेवाभावी कार्य उत्तमरीत्या पार पाडण्यासाठी रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष ॲड दीपक फडे, सचिव रो.केतन बोरावके, प्रकल्प प्रमुख डॉ.बाहुबली दोशी, रोटरी क्लबचे सर्व सदस्य, तसेच सोनाज परिवार, जैन सोशल ग्रुपचे शितल व्होरा आणि सर्व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

              तसेच सायंकाळी बँक ऑफ इंडिया, माळेवाडी-अकलूज शाखा शेजारी  रोटरी क्लब अकलूज आणि श्री विठ्ठल भक्त मंडळ अकलूज यांचे संयुक्त विद्यमाने पायी चालत आलेल्या व थकलेल्या वारकऱ्यांसाठी तरतरी यावी म्हणून 1650 वारकऱ्यांना चहा तसेच 1200 बिस्किट पुड्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

              याप्रसंगी रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष ॲड दीपक फडे, रो.सचिव केतन बोरावके, रो.अमित सोनाज, रो.गजानन जवंजाळ, रो.प्रविण कारंडे, श्री विठ्ठल भक्त मंडळाचे सदस्य आदित्य मुळीक, बापूसाहेब देशमुख, राजेंद्र शिंदे, विक्रम पाटील, अशोक घोडके, शशिकांत राऊत, वैभव उत्तरकर, गणेश फुगे, राजेंद्र नरूटे, संतोष नरुटे, बल्लाळेश्वर देशमुख आदींनी विशेष परिश्रम घेतले.

              तसेच चार जुलै रोजी सायंकाळी रोटरी क्लब अकलूज आणि बोरावके पेट्रोकेअर यांच्या संयुक्त विद्यमाने या पालखी सोहळ्यातील मुक्कामी येणाऱ्या वारकऱ्यांना अन्नदान तसेच 700 लिटर फिल्टर पाण्याचे मोफत वितरण करण्यात आले. यासाठी रोटरी क्लब अकलूजच्या सदस्यांनी तसेच बोरावके पेट्रोकेअरचे श्सुनील बोरावके आणि कुटुंबीय यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages