पी.एम. किसान योजनेच्या लाभार्थींची बँक खाती तात्काळ आधारशी लिंक करावीत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 13, 2022

पी.एम. किसान योजनेच्या लाभार्थींची बँक खाती तात्काळ आधारशी लिंक करावीत

पी.एम. किसान योजनेच्या लाभार्थींची बँक खाती तात्काळ आधारशी लिंक करावीत

जिल्ह्यातील 1 लाख 60 हजार लाभार्थी आधारशी लिंक नाहीत; आधार लिंक करण्यासाठी तालुकास्तरावर  विशेष मोहीम राबवावी

            सोलापूर (कटुसत्य वृत्त): प्रधानमंत्री क‍िसान योजने अंतर्गत नोंदणीकृत लाभार्थ्यांना यापुढील जमा होणारे हप्ते हे आधार संलग्न बँक खात्यात अदा होणार असल्याने सर्व लाभार्थ्यांची बँक खाती तात्काळ आधार संलग्न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

             सोलापुर जिल्ह्यातील एकुण नोंदणीकृत लाभार्थ्यांपैकी 6 लाख 10 हजार 218 लाभार्थ्यांचा डाटा पी.एम.किसान पोर्टलवर आधार संलग्न आहे. उर्वरित 1 लाख 60 हजार 496  लाभार्थ्यांचा डाटा NPCI शी आधार लिंक नाही. तसेच जिल्ह्यातील तीन हजार पाच लाभार्थ्यांचे NPCI Verification पेंडिग आहे.

            पी.एम.किसान पोर्टवरील NPCI शी आधार लिंक नसलेल्या लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट 2022 नंतरचे हप्ते प्राप्त होण्यास अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे सर्व तालुक्यातील लाभार्थ्यांचा डाटा NPCI शी आधार लिंक करण्यासाठी तालुका स्तरावर सर्व संबंधीत यंत्रणांनी विशेष मोहिम स्वरुपात बँक खाते आधाारशी संलग्न करण्याचाा उपक्रम राबवावा. ही मोहिम जिल्हा अग्रणी बँकेच्या समन्वयाने पूर्ण करण्यात यावी जेणे करुन माहे ऑगस्ट 2022 पासून पुढील मिळणाऱ्या लाभापासून पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षताा घ्यावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी  पी एम किसान योजनेच्या  जिल्हास्तरीय नोडल अधिकारी शमा पवार यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages