सैन्य दलातील अग्नीवीर भरतीसाठी उमेदवारांनी 30 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत

राहुरी येथे सोलापूरसह सहा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी सैन्य भरती मेळावा
भारतीय सैन्यदलाच्या www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर
ऑनलाइन अर्ज करावेत
सोलापूर, (कटुसत्य वृत्त):- रिक्रुटिंग ऑफिस, पुणेमार्फत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी जि. अहमदनगर येथे 23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2022 या कालावधीत अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपिक/स्टोअरमन (पुरुष) या संवर्गासाठी सैन्य भरती मेळावा आयोजित केला आहे. सोलापूरसह पुणे, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांतील उमेदवार www.joinindianarmy.nic.in या भारतीय सैन्य दलाच्या वेबसाइटवर 30 जुलैपर्यंत नोंदणी करून भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात.
उपरोक्त भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी 01 जुलै ते 30 जुलै 2022 या कालावधीत www.joinindianarmy.nic.in वर सुरू झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील इच्छूक व पात्र उमेदवारांनी उपरोक्त नमूद केलेल्या संकेतस्थळावर 30 जुलै 2022 पर्यंत ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन पुणे येथील रिक्रुटिंग ऑफिसचे अधिकारी येसू राजू के. यांनी केले आहे. या भरती प्रक्रियेविषयी अधिकची माहिती उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment