भाजपा वैद्यकीय आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. नागनाथ दगडे... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 13, 2022

भाजपा वैद्यकीय आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. नागनाथ दगडे...

भाजपा वैद्यकीय आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. नागनाथ दगडे...

               बेंबळे : सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी माळखांबी तालुका माळशिरस येथील डॉ. नागनाथ दगडे यांची निवड करण्यात आली आहे .भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना या निवडीचे पत्र दिले . भाजपा वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अजित गोपचीडे, उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब हरपळे, आयुर्वेद आघाडीच्या प्रमुख डॉ. उज्वला हाके, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे प्रशासकीय सदस्य डॉ. बाळकृष्ण गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये हे  नियुक्तीपत्र देण्यात आले. डॉक्टर नागनाथ दगडे हे बेंबळे ता.माढा येथील यशवंत क्लिनिकचे डॉ. यशवंत दगडे यांचे बंधू आहेत. डॉ. नागनाथ दगडे यांनी सांगली येथे बी एच एम एस चे शिक्षण घेतले असून छत्रपती उदयनराजे भोसले प्रणित राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. वारीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांची मोफत सेवा, गड किल्ले संवर्धनासाठी चालू असलेले काम ,वैद्यकीय मोफत औषधोपचार शिबिर, कोरोना काळात त्यांनी केलेले अन्यसाधारण काम ,वृक्षारोपण, गरजूंना मदत, अडीअडचणी मध्ये मदतीसाठी धावून जाणारे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख आहे.

               माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर, माळशिरस तालुक्याचे आमदार रामभाऊ सातपुते, भाजपा प्रदेश सदस्य राजकुमार पाटील, केंद्रीय होमिओपॅथिक परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर अरुण भस्मे, भाजपा वैद्यकीय आघाडीचे होमिओपॅथिक संयोजक डॉक्टर भालचंद्र ठाकरे ,वैद्यकीय आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र संयोजिका डॉक्टर सौ संगीता पाटील, मिशन आयुर्वेदिक चे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर हर्षवर्धन गायकवाड, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर ,सरचिटणीस वसंतराव गायकवाड, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर अक्षय वाईकर होमिओपॅथिक जिल्हा  असोसिएशनचे सदस्य डॉक्टर शिवाजीराव काळे, डॉक्टर विठ्ठल कवितके, डॉक्टर अनिल बळते, डॉक्टर नितीन कुबेर ,डॉक्टर तुषार माने, डॉक्टर प्रशांत पाटील, डॉक्टर विजय निलटे, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे हिम्मत नागणे ,बिभीषण पाटील, सुमित नागणे ,सुदर्शन लाड ,दलित महासंघाचे बच्चन साठे आदी मान्यवरासहित इतर शेकडो नागरिकांनी  डॉक्टर दगडे यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages