चांदज येथील दोन नंबर सोसायटीच्या चेअरमन पदी सोमनाथ टकले...


व्हाईस चेअरमन पदी भाऊसाहेब तांबवे
बेंबळे (कटुसत्य वृत्त): माढा तालुक्यातील कोंढारभागातील प्रतिष्ठेची समजली जाणारी चांदज नंबर २ वी.का. सेवा सहकारी सोसायटी ची निवडणूक नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली .१९९७ साली स्थापन झालेल्या या सोसायटीमध्ये एकूण सभासद संख्या २५०असून १२५ कर्जदार सभासद असलेल्या या सोसायटीने १ कोटी २५ लाखाचे कर्ज वाटप केले असून १ कोटी १५ लाख रुपये बँक कर्ज घेतलेले आहे या सोसायटीची दरवर्षी शंभर टक्के कर्ज वसुली होते त्याचबरोबर सोसायटीच्या सभासदांना लाभांश वाटप केले जाते. या सोसायटीची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये सोमनाथ टकले, भाऊसाहेब तांबवे, अनिल पाटील , काशिनाथ खताळ, शंकर बागाव, नामदेव वाघमोडे , तात्यासाहेब हेगडकर, निवृत्ती तांबवे, भजनदास गुरव , सचिन गायकवाड, रामभाऊ लठ्ठे, सौ.हिराबाई रुपनवर,सौ. सिंधुताई गाडे, या संचालकांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली तसेच संचालकांमधून सोसायटीचे चेअरमन म्हणून सोमनाथ टकले तर व्हाईस चेअरमन म्हणून भाऊसाहेब तांबवे यांची एक मताने निवड करण्यात आली. सदर निवडीनंतर सर्व संचालकांचा तसेच नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा सत्कार व वडोली सोसायटीचे सचिव सचिन रुपनवर नगोर्ली सोसायटीचे सचिव संतोष पवार, विठ्ठल गुरव, यांचा सत्कार मारुती टकले डी.वाय.एसपी, महाराष्ट्र पोलीस यांच्या शुभहस्ते करण्यात आला .यावेळी बोलताना मारुती टकले म्हणाले नूतन संचालकांनी तसेच चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून सोसायटीचे कामकाज काटकसरीने व उत्तमपणे चालवावे ही सोसायटी सोलापूर जिल्ह्यातील सर्व विकास सेवा सोसायटींना आदर्श ठरेल असा कारभार राबवावा. येणाऱ्या काळात सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी हिताच्या नवीन नवीन योजना राबविण्यात याव्यात. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंध लेंडवे यांनी काम पाहिले.
पदाधिकाऱ्यांच्या निवड कार्यक्रमाला चांदज सोसायटीचे माजी संचालक रामभाऊ टकले, माजी सरपंच निवृत्ती तांबवे, संजय गायकवाड, बाळासो तांबवे, कुबेर कोळी, पोलीस कॉन्स्टेबल अंकुश टकले, वडोली विकास सेवा सोसायटीचे चेअरमन विष्णू खताळ वडोली विकास सेवा सोसायटीचे संचालक तानाजी सलगर दत्तू टकले तात्यासो कुंभार, विठ्ठल पाटील , रावसाहेब पाटील, बळीराम टकले , महादेव घाडगे , माजी उपसरपंच ईश्वरा कदम, विजय देवकाते, डॉक्टर नितीन पाडुळे, बंडू रुपनवर, गंगाराम हेगडकर , नागनाथ रुपनवर, शंकर दादा खंकाळ, मुबारक मुलाणी, तानाजी खताळ, दादा हेगडकर, सुरेश पाटील, नवनाथ वगरे , गंगाराम हेगडकर, पांडुरंग कुंभार, वडोली नंबर दोन सोसायटीचे चेअरमन बापू बंडगर, व चांदज नंबर दोन विकास सेवा सोसायटीचे सर्व सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच निवृत्ती तांबवे यांनी केले तर शेवटी आभार सचिव विठ्ठल गुरव यांनी मानले.
No comments:
Post a Comment