विधानभवन परीसरात कडेकोट बंदोबस्त ; सभागृहात भगवे फेटे

मुंबई, (नासिकेत पानसरे):- विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर विधानभवन परीसरात सकाळ पासूनच सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.विधानभवन किंवा नरीमन पॉइंट परीसरातून जाणाऱ्या बस प्रवाशांनाही आपण कुठे चालला आहात कुठे कामाला आहात असेही विचारण्यात येत होतं. तर सभागृहात जाणाऱ्या कर्मचारी व वृत्तपत्र आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींची सुद्धा कसुन चौकशी करण्यात येत होते.
सभागृह सुरू होण्यापुर्वी १०.२५ च्या सुमारास भाजपाचे सदस्य़ भगवा फेटा बांधून सभागृहात आले. कोणी आपल्या मोबाइल मधून सेल्फी काढत होते तर कोणी एकमेकांचे फोटो काढत होते.१०.४५ च्या सुमारास शिवसेना बंडखोर सदस्य सभागृहात आले. त्यांनीही भगवे फेटे परीधान केले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुललेले दिसत होते. सभागृहात विरोधी सदस्य तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे आगमन होताच जय शिवाजी...जय भवानी...हर हर महादेव...अशा घोषणा देण्यात आल्या तर आनंद दिघे यांच्याही नावाच्या घोषणा देण्यात आल्या.मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मात्र गर्द भगव्या रंगाचे पटेरी असे वेगळेच फेटे परीधान केले होते.
वंदे मातरम् गीताने सभागृहाचे कामकाज सुरू झाले. नवीन सदस्यांच्या परीचया नंतर उपाध्यक्षांनी राज्यपालांचा संदेश वाचून दाखविला. त्यावेळी राष्टवादीचे जयंत पाटील यांनी हरकत घेत महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना कितींदा तरी नाना पटोले यांच्या राजीनाम्या नंतर अध्यक्ष पदाची निवडणुक घ्या अशी विनंती केली. पण ते कशाची वाट पहात होते ते आता कळालं.जर शिंदे यांना ही संधी पाहिजे होती तर ते आधी आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही त्यांना (उद्धव ठाकरे) तशी विनंती केली असती तर ही वेळ आलीच नसती, असा टोला ऱाज्यपालांना आणि मुख्यमंत्री शिंदे यांनाही लगावला.राज्यपालांना यापुढे शेवटची संधी आहे त्यांनी आमच्या १२ सदस्यांची यादी मंजूर करावी.
त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी नाना पटोलेंचे आभार मानतो त्यांच्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली.असे ते म्हणाले.
No comments:
Post a Comment